Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 47

99 Mantra
17/47
Devata- मरुतो देवताः Rishi- अप्रतिरथ ऋषिः Chhand- निचृदार्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
अ॒सौ या सेना॑ मरुतः॒ परे॑षाम॒भ्यैति॑ न॒ऽओज॑सा॒ स्पर्द्ध॑माना। तां गू॑हत॒ तम॒साप॑व्रतेन॒ यथा॒मीऽअ॒न्योऽअ॒न्यन्न जा॒नन्॥४७॥

अ॒सौ। या। सेना॑। म॒रु॒तः॒। परे॑षाम्। अ॒भि। आ। एति॑। नः॒। ओज॑सा। स्पर्द्ध॑माना। ताम्। गू॒ह॒त॒। तम॑सा। अप॑व्रते॒नेत्यप॑ऽव्रतेन। यथा॑। अ॒मीऽइत्य॒मी। अ॒न्यः। अ॒न्यम्। न। जा॒नन् ॥४७ ॥

Mantra without Swara
असौ या सेना मरुतः परेषामभ्यैति नऽओजसा स्पर्धमाना । ताङ्गूहत तमसापव्रतेन यथामीऽअन्यो अन्यन्न जानन् ॥

असौ। या। सेना। मरुतः। परेषाम्। अभि। आ। एति। नः। ओजसा। स्पर्द्धमाना। ताम्। गूहत। तमसा। अपव्रतेनेत्यपऽव्रतेन। यथा। अमीऽइत्यमी। अन्यः। अन्यम्। न। जानन्॥४७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (सैनिक विद्वानांना म्हणत आहेत) हे (मरूत:) प्रत्येक ऋतूमधे यज्ञादी कर्म करणाऱ्या विद्वज्जनहो, (वा) (असौ) ती जी (स्पर्द्धमाना) आमच्यावर आक्रमण करीत येणारी (परेषाम्‌) शत्रूंची (सेना) सेना आहे, ती (ओजसा) अत्यंत वेगाने वा शक्ति संपन्न होऊन (न:) आम्हा (सैनिकांच्या दिशेने) (अभि, आ, एति) चाल करून येत आहे (ताम्‌) त्या शत्रुसैन्याला तुम्ही (यात्रिक जन, बाँब तोफ, आदीद्वारे प्रहार करणारे आमचे सहकारी) (तमसा) तोफ आदी शक्तींद्वारे होणाऱ्या धुराने (दिशाभ्रष्ट करून टाका) (धुराचा इतका लोळ उठू द्या की (धुराचा विशाल पर्वत उभा राहील व त्यामुळे चाल करून येणारे शत्रुदल गोंधळून जाईल) त्या धुराने सर्व वातावरण (ग्रहत) झाकून टाका की ज्यामुळे (अभी) हे शत्रुसैन्य (अन्य:) अन्यम्‌) आपसातील एकमेकालादेखील (न) (जानन्‌) ओळखू वा पाहू शकणार नाहीत, तुम्ही असा पराक्रम करा. ॥47॥
Essence
भावार्थ - जेव्हा शत्रुसैन्य आपल्या सैन्यावर आक्रमण करीत येत असेल, तेव्हा त्यावर चारी बाजूंनी अस्त्र-शस्त्रांचे प्रहार करावेत. शिवाय (बाँब आदीद्वारे) इतका धूर वा धुलीचे वादळ उठवावे की शत्रुसैनिक एकमेकाला पाहू शकणार नाहीत. सेनापतीने याविषयीच्या सर्व तंत्राची माहिती करून घेतली पाहिजे ॥47॥
Subject
पुन्हा तोच विषय -