Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 46

99 Mantra
17/46
Devata- योद्वा देवता Rishi- अप्रतिरथ ऋषिः Chhand- विराडार्ष्यनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
प्रेता॒ जय॑ता नर॒ऽइन्द्रो॑ वः॒ शर्म॑ यच्छतु। उ॒ग्रा वः॑ सन्तु बा॒हवो॑ऽनाधृ॒ष्या यथास॑थ॥४६॥

प्र। इ॒त॒। जय॑त। न॒रः॒। इन्द्रः॑। वः॒। शर्म॑। य॒च्छ॒तु॒। उ॒ग्राः। वः॒। स॒न्तु॒। बा॒हवः॑। अ॒ना॒धृ॒ष्याः। यथा॑। अस॑थ ॥४६ ॥

Mantra without Swara
प्रेता जयता नरऽइन्द्रो वः शर्म यच्छतु । उग्रा वः सन्तु बाहवो नाधृष्या यथासथ ॥

प्र। इत। जयत। नरः। इन्द्रः। वः। शर्म। यच्छतु। उग्राः। वः। सन्तु। बाहवः। अनाधृष्याः। यथा। असथ॥४६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (नर:) (सैन्यातील) अनेक कामें करणाऱ्या कर्मचारीगण वा यांत्रिकजनहो, तुम्ही (यथा) ज्या पद्धतीने शत्रूपक्षाला (पराभूत करू शकाल) (इत) ते सर्व करा आणि (जमत) विजय प्राप्त करा. (इन्द्र:) शत्रूंना विर्दीर्ण करणारा तुमचा सेनापती (व:) तुम्हां लोकांकरिता (शर्म्म) राहण्यासाठी चांगले घर (प्र, यच्छतु) देतो. (व:) तुमच्या (बाहव:) दोन्ही बाहू (उग्रा:) दृढ व भयकारक (सन्तु) असाव्यात आणि (अनाधृष्या:) तुम्ही शत्रूपासून कधीही भय मानू नका (अथवा तुमचा एवढा दरारा असावा की तुम्हाला भयभीत करण्याचा विचार देखील शत्रूच्या मनात कधी येऊ नये ॥46॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. जे वीर सैनिक शत्रूंना जिंकून येतील, सेनापतीने त्या विजयी वीरांचा धन, अन्न, गृह, वस्त्र आदी देऊन नेहमी सत्कार गौरव करावा. तसेच ज्याप्रमाणे सैनिकगण आधिक बली होतील, ते सर्व करावे म्हणजे त्यांच्यासाठी व्यायामशाळा, अस्त्र-शस्त्र प्रशिक्षण शिबीरे आदींचे आयोजन करावे ॥46॥
Subject
पुढील मंत्रात तोच विषय -