Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 43

99 Mantra
17/43
Devata- इन्द्रो देवता Rishi- अप्रतिरथ ऋषिः Chhand- निचृदार्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
अ॒स्माक॒मिन्द्रः॒ समृ॑तेषु ध्व॒जेष्व॒स्माकं॒ याऽइष॑व॒स्ता ज॑यन्तु। अ॒स्माकं॑ वी॒राऽउत्त॑रे भवन्त्व॒स्माँ२ऽउ॑ देवाऽअवता॒ हवे॑षु॥४३॥

अ॒स्माक॑म्। इन्द्रः॑। समृ॑ते॒ष्विति॒ सम्ऽऋ॑तेषु। ध्व॒जेषु॑। अ॒स्माक॑म्। याः। इष॑वः। ताः। ज॒य॒न्तु॒। अ॒स्माक॑म्। वी॒राः। उत्त॑र॒ इत्युत्ऽत॑रे। भ॒व॒न्तु॒। अ॒स्मान्। ऊँ॒ऽइत्यूँ॑। दे॒वाः॒। अ॒व॒त॒। हवे॑षु ॥४३ ॥

Mantra without Swara
अस्माकमिन्द्रः समृतेषु ध्वजेष्वस्माकँयाऽइषवस्ता जयन्तु । अस्माकँवीराऽउत्तरे भवन्त्वस्माँ उ देवाऽअवता हवेषु ॥

अस्माकम्। इन्द्रः। समृतेष्विति सम्ऽऋतेषु। ध्वजेषु। अस्माकम्। याः। इषवः। ताः। जयन्तु। अस्माकम्। वीराः। उत्तर इत्युत्ऽतरे। भवन्तु। अस्मान्। ऊँऽइत्यूँ। देवाः। अवत। हवेषु॥४३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (देवा:) विजयाची इच्छा करणाऱ्या (राष्ट्रातील) विद्वज्जनहो, तुम्ही (अस्माकम्‌) आम्हा (आम्हा सैनिकांना) (समृतोषु) सत्य आणि न्यायाचे प्रतीक असलेल्या चिन्हांनी अंकित असे (ध्वजेषु) ध्वज रथ आदी वाहनांवर लावा की ज्यायोगे आपल्या सैन्यातील वीर सैनिक आपल्या पक्षातील लोकांना शकतील (या चिन्हांनी अंकित ध्वज आणि यान आपल्या सरदाराचा आहे, हे सैनिक ओळखतील) आणि अशा ध्वजाखाली रथात वसलेला जो (इन्द्र:) आमचा ऐश्‍वर्यशाली सेनापती आहे (तो ही सरदारांना ओळखील) (अशा दृढ स्थितीत असतांना) (या:) जस (इषव:) आमच्या विविध सेना आहेत (स्थलसेना, वायुसेना, जलसेना) आणि सेनापती इन्द्र आहे, (ता:) ते सर्व (म्हणजे आम्ही व सेनापती) (हवेषु) शत्रूला युद्धाकरिता विश्‍वासाने आव्हान करू आणि शत्रूला (जयन्तु) जिंकू (अस्माकम्‌) आमच्यातील (वीरा:) सर्व वीरजन, (उत्तरे) विजयानंतर सुखी जीवन (भवन्तु) प्राप्त करो. हे विद्वज्जन हो, तुम्ही (उ) (युद्धणेत्रामधे) सर्वत्र (अस्मान्‌) आम्हां सैनिकांच्या (अरव) रक्षण करा (आपल्या बुद्धी, युक्ती, योजना आदीद्वारे आमच्या पाठीशी रहा ॥43॥
Essence
भावार्थ - सैन्यातील अधिकारी (ब्रिगेडियर, कर्नल अथवा बटालियन व कंपनी) तसेच सेनापती या सर्वांसाठी आवश्‍यक आहे की त्यांनी आपल्या रथांवर भिन्न चिन्ह असलेले ध्वज लावावेत की ज्यायोगे हा रथ कोणाचा आहे, हे सैनिक ओळखू शकतील. या व्यतिरिक्त सर्वांनी अशी योजना वा व्यवस्था करावी की ज्यामुळे युद्धात आपल्या सैनिकांची, सैनिकदलाची अधिक प्राणहानी होऊ नये. कारण की आपल्या पक्षातील अधिक सैनिक युद्धात कामी आले, तर विजय मिळणे कठीण आहे. हे सर्वांनी जाणून असावे. ॥43॥
Subject
पुन्हा तोच विषय –