Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 41

99 Mantra
17/41
Devata- इन्द्रो देवता Rishi- अप्रतिरथ ऋषिः Chhand- आर्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
इन्द्र॑स्य॒ वृष्णो॒ व॑रुणस्य॒ राज्ञ॑ऽआदि॒त्यानां॑ म॒रुता॒ शर्द्ध॑ऽउ॒ग्रम्। म॒हाम॑नसां भुवनच्य॒वानां॒ घोषो॑ दे॒वानां॒ जय॑ता॒मुद॑स्थात्॥४१॥

इन्द्र॑स्य। वृष्णः॑। वरु॑णस्य। राज्ञः॑। आ॒दि॒त्याना॑म्। म॒रुता॑म्। शर्द्धः॑। उ॒ग्रम्। म॒हाम॑नसा॒मिति॑ म॒हाऽम॑नसाम्। भु॒व॒न॒च्य॒वाना॒मिति॑ भुवनऽच्य॒वाना॑म्। घोषः॑। दे॒वाना॑म्। जय॑ताम्। उत्। अ॒स्था॒त् ॥४१ ॥

Mantra without Swara
इन्द्रस्य वृष्णो वरुणस्य राज्ञ आदित्यानाम्मरुताँ शर्धऽउग्रम् । महामनसाम्भुवनच्यवानाङ्घोषो देवानाञ्जयतामुदस्थात् ॥

इन्द्रस्य। वृष्णः। वरुणस्य। राज्ञः। आदित्यानाम्। मरुताम्। शर्द्धः। उग्रम्। महामनसामिति महाऽमनसाम्। भुवनच्यवानामिति भुवनऽच्यवानाम्। घोषः। देवानाम्। जयताम्। उत्। अस्थात्॥४१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - जो (वृष्ण:) पराक्रमी (इन्द्रस्य) सेनाधय्क्ष असेत, तसेच (वरूणस्य) सर्वोत्तम आणि (यज्ञ:) न्याय आणि विस्य गुणांमुळे जो कीर्तिमान असून सर्वांचा अधिपती राजा असेल, त्याने (भुषनच्यतानमा) उत्तम घरात (सैनिकी निवासगृहात) राहणाऱ्या (महामनसाम्‌) श्रेष्ठ विचार करणाऱ्या विवेकी लोकांना (आपल्याजवळ ठेवावे) तसेच (जयताम्‌) जय प्राप्त करण्यात समर्थ, असे, आणि (आदित्यानाम्‌) अठ्ठेचाळीस वर्षापर्यंत ब्रह्मचर्य धारण केलेल्या (मसताम्‌) विद्या व बल यांनी युक्त अशा (देवानाम्‌) ज्ञानी व्यक्तींना (जवळ ठेवावे) (तसेच युद्ध आरंभ करण्यापूर्वी (उग्रम्‌) शत्रुपक्षाला असह्य असा भयदायक (शर्द्ध:) सैन्य (सेनेचा वाद्यघोष वाजविणारा वाद्यवृंद) ठेवावा की ज्याच्या (घोष:) शूरत्व आणि उत्साह वाढविणाऱ्या नादघोषामुळे (आपल्या सेनेचा उत्साह द्विगुणित होईल व शत्रू भयकंपित होईल) युद्धारंभी असा वाद्य घोष करावा ॥41॥
Essence
भावार्थ - सैन्याध्यक्षाने प्रशिक्षण व युद्ध याप्रसंगी ज्यायोगे आपल्या सैनिकांच्या मनात वीरत्व जागृत होईल, अशा रणवाद्यांचा घोष करावा व त्यांना आनंदित उत्साहित ठेवावे. तसेच दीर्घकाळापर्यंत ब्रह्मचर्य धारण केलेले व अधिक विद्यवान असे जे लोक असतील, म्हणजे जे आत्मिक व शारीरिकशक्ती दृष्ट्या संपन्न असतील, त्या लोकांनाच सैन्याधिकारी म्हणून नेमणे उचित आहे, (हे राजाने जाणून घ्यावे) ॥41॥
Subject
पुनश्‍च तोच विषय-