Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 4

99 Mantra
17/4
Devata- अग्निर्देवता Rishi- मेधातिथिर्ऋषिः Chhand- भुरिगार्षी गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
स॒मु॒द्रस्य॒ त्वाव॑क॒याग्ने॒ परि॑व्ययामसि। पा॒व॒कोऽअ॒स्मभ्य॑ꣳ शि॒वो भ॑व॥४॥

स॒मु॒द्रस्य॑। त्वा॒। अव॑कया। अग्ने॑। परि॑। व्य॒या॒म॒सि॒। पा॒व॒कः। अ॒स्मभ्य॑म्। शि॒वः। भ॒व॒ ॥४ ॥

Mantra without Swara
समुद्रस्य त्वावकयाग्ने परि व्ययामसि । पावकोऽअस्मभ्यँशिवो भव ॥

समुद्रस्य। त्वा। अवकया। अग्ने। परि। व्ययामसि। पावकः। अस्मभ्यम्। शिवः। भव॥४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने अग्नीप्रमाणे तेजस्वी असलेले सभापती महोदय, आम्ही (राष्ट्राचे नागरिक) (समुद्रस्य) आकाशामधे (अवकया) आपल्याकडून केलेल जाणारे जे रक्षणकर्म आहे (वायुसेनेद्वारे आपण राष्ट्राचा आकाश सुरक्षित व निर्भय केलेला आहे) त्या रक्षणकार्यमुळे आम्ही (त्या) आपणाकडे (परि व्ययामसि) निशंक मनाने येतो. (पावक:) पवित्र कार्य करणारे आपण देखील (अस्त्रभ्यम्‌) आमच्यासाठी (शिव:) कल्याणकारी (भव) व्हा. (आम्हाला आपल्या आश्रयाखाली सुरक्षित वाटते. आपण आमची ही कामना पूर्ण करा) ॥4॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे मनुष्य समुद्रातील (वा आकाशातील) प्राण्यांचे रक्षण करून त्यांना सुखी व निर्भय करतात, त्याप्रमाणे धर्मात्मा रक्षक सभापतीने (राजाने) आपल्या प्रजाजनांचे रक्षण करून त्यांना सदैव आनंदित ठेवले पाहिजे. ॥4॥
Subject
सभापतीने काय केले पाहिजे (त्याची कर्तव्यें) काय आहेत?) पुढील मंत्रात याविषयी कथन केले आहे –