Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 39

99 Mantra
17/39
Devata- इन्द्रो देवता Rishi- अप्रतिरथ ऋषिः Chhand- निचृदार्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
अ॒भि गो॒त्राणि॒ सह॑सा॒ गाह॑मानोऽद॒यो वी॒रः श॒तम॑न्यु॒रिन्द्रः॑। दु॒श्च्य॒व॒नः पृ॑तना॒षाड॑यु॒ध्योऽअ॒स्माक॒ꣳ सेना॑ अवतु॒ प्र यु॒त्सु॥३९॥

अ॒भि। गो॒त्राणि॑। सह॑सा। गाह॑मानः। अ॒द॒यः। वी॒रः। श॒तम॑न्यु॒रिति॑ श॒तऽम॑न्युः। इन्द्रः॑। दु॒श्च्य॒व॒न इति॑ दुःऽच्यव॒नः। पृ॒त॒ना॒ऽषाट्। अ॒यु॒ध्यः᳕। अ॒स्माक॑म्। सेनाः॑। अ॒व॒तु॒। प्र। यु॒त्स्विति॑ यु॒त्सु ॥३९ ॥

Mantra without Swara
अभि गोत्राणि सहसा गाहमानो दयो वीरः शतमन्युरिन्द्रः । दुश्च्यवनः पृतनाषाडयुध्यो स्माकँ सेना अवतु प्र युत्सु ॥

अभि। गोत्राणि। सहसा। गाहमानः। अदयः। वीरः। शतमन्युरिति शतऽमन्युः। इन्द्रः। दुश्च्यवन इति दुःऽच्यवनः। पृतनाऽषाट्। अयुध्यः। अस्माकम्। सेनाः। अवतु। प्र। युत्स्विति युत्सु॥३९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वज्जनहो, जो मनुष्य (युत्सु) ज्या युद्धामधे सर्व पदार्थांचा संघर्ष होतो, (विध्वंस होतो) अशा भीषण युद्धांमधे (सहसा) आपल्या सामर्थ्याने (गोत्राणि) शत्रुकुळांना (प्र गाहमान:) कठोर प्रयत्नांद्वारे नेस्तनाबूत करतो, जो (अदय:) शत्रूंप्रती निर्दयी असून ज्यास (रातमन्यु:) शेकडो रीतीने क्रोध प्रकट करता येतो, (अनेकांवर योग्य त्या रीतीने दहशत बसवता येते) जो (दुश्‍च्यवन:) शत्रूंचा पूर्ण नि:पात करण्यात समर्थ आहे आणि पृतनाषाट्) शत्रूचा कसल्याही आक्रमणाला तोंड देऊ शकतो. तसेच (अयुध्य:) ज्याच्याशी युद्ध करतात शत्रू देखील कचरतात आणि जो (वीर:) शत्रूंना ध्वस्त करतो, अशा गुणांनी समृद्ध तो वीर परुष (अस्माकम्‌) आमच्या (सेना:) सैन्यांचे (अभिभवतु) सर्वदृष्ट्या पालन वा रक्षण करो. पुरुष (इन्द्र:) सेनाध्यक्ष व्हायला हवा आमच्या सेनेचा सेनापती व्हावा, असा आदेश तुम्ही विद्वानांनी द्यावा (तुम्ही विद्वज्जनांनी उपयुक्त गुणांनी युक्तवीराला सेनापती म्हणून निवडावे) ॥39॥
Essence
भावार्थ - जो पुरुष धार्मिकजनांवर दया करणारा आणि दुष्टांचा निर्दयपणे निर्दालन करणारा तसेच सर्वांचे रक्षण करण्यास समर्थ असेल, त्यावीर पुरुषालाच सैन्याचा प्रमुख अधिकारी म्हणून नेमावे. ॥39॥
Subject
पुढील मंत्रातही तोच विषय -