Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 32

99 Mantra
17/32
Devata- विश्वकर्मा देवता Rishi- भुवनपुत्रो विश्वकर्मा ऋषिः Chhand- स्वराडार्षी पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
वि॒श्वक॑र्मा॒ ह्यज॑निष्ट दे॒वऽआदिद् ग॑न्ध॒र्वोऽअ॑भवद् द्वि॒तीयः॑। तृ॒तीयः॑ पि॒ता ज॑नि॒तौष॑धीनाम॒पां गर्भं॒ व्यदधात् पुरु॒त्रा॥३२॥

वि॒श्वऽक॑र्मा। हि। अज॑निष्ट। दे॒वः। आत्। इत्। ग॒न्ध॒र्वः। अ॒भ॒व॒त्। द्वि॒तीयः॑। तृ॒तीयः॑। पि॒ताः। ज॒नि॒ता। ओष॑धीनाम्। अ॒पाम्। गर्भ॑म्। वि। अ॒द॒धा॒त्। पु॒रु॒त्रेति॑ पुरु॒ऽत्रा ॥३२ ॥

Mantra without Swara
विश्वकर्मा ह्यजनिष्ट देवऽआदिद्गन्धर्वोऽअभवद्द्वितीयः । तृतीयः पिता जनितौषधीनामपाङ्गर्भम्व्यदधात्पुरुत्रा ॥

विश्वऽकर्मा। हि। अजनिष्ट। देवः। आत्। इत्। गन्धर्वः। अभवत्। द्वितीयः। तृतीयः। पिताः। जनिता। ओषधीनाम्। अपाम्। गर्भम्। वि। अदधात्। पुरुत्रेति पुरुऽत्रा॥३२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, (जाणून घ्या की) या जगात (सर्वप्रथम) (विश्‍वकर्मा) सर्व शुभ कार्य करणारा तो (देव:) दिव्यस्वरूप वायू (इत्‌) निश्‍चयाने (अभवत्‌) उत्पन्न होतो. (प्राणदायक वायू सर्वप्रथम उत्पन्न होतो) (आत्‌) त्यानंतर (गन्धर्व:) गो म्हणजे पृथ्वी, त्यास धारण करणारा सूर्य अथवा सूत्रात्मानामक वायू (अजनिष्ट) उत्पन्न होतो. त्यानंतर (ओषधीनाम्‌) यव आदी औषधी, तसेच (अपाम्‌) जल आणि प्राण यांचे (पिता) पालन करणारा (द्वितीय:) दुसरा धनंजय नामक वायू की जो प्राण्यांच्या (गर्भम्‌) गर्भ धारणासाठी (व्यदधात्‌) कारणीभूत होतो. यानंतर (पूरुत्रा) अनेकांचे रक्षण करणारा (जनिता) जल धारण करणारा मेध (तृतीय:) तिसऱ्या क्रमांकावर उत्पन्न होतो. हे मनुष्यानो, तुम्ही हे सत्य जाणून घ्या. ॥32॥
Essence
भावार्थ- सर्व लोकांनी हे सत्य जाणले पाहिजे की या जगात सर्व कर्माचे सेवन करणारे (सर्व पदार्थांचा उपभोग घेणारे) जीव-जीवात्मा सर्वप्रथम आहेत. त्यानंतर विद्युत अग्नी, वायू, सूर्य, पृथ्वी आदींचा क्रम येतो की जे लोक-लोकांतराचे धारण, पालन करतात. यांचा क्रम दुसरा आहे तिसऱ्या स्थानावर आहेत मेघ. या तीन पैकी प्रथम म्हणजे जीवात्मा अज आहे, तो अनादी असून कधी उत्पन्न होत नाही. दुसरे आणि तिसरे-विद्युत आदी आणि मेघ, हे उत्पन्न होणारे आहेत, पण ते देखील कारणरुपाने नित्य आहेत ॥32॥
Subject
पुन्हा तोच विषय (ईश्‍वराचे स्वरूप) –