Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 31

99 Mantra
17/31
Devata- विश्वकर्मा देवता Rishi- भुवनपुत्रो विश्वकर्मा ऋषिः Chhand- भुरिगार्षी पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
न तं वि॑दाथ॒ यऽइ॒मा ज॒जाना॒न्यद्यु॒ष्माक॒मन्त॑रं बभूव। नी॒हा॒रेण॒ प्रावृ॑ता॒ जल्प्या॑ चासु॒तृप॑ऽउक्थ॒शास॑श्चरन्ति॥३१॥

न। तम्। वि॒दा॒थ॒। यः। इ॒मा। ज॒जान॑। अ॒न्यत्। यु॒ष्माक॑म्। अन्तर॑म्। ब॒भू॒व॒। नी॒हा॒रेण॑। प्रावृ॑ताः। जल्प्या॑। च॒। अ॒सु॒तृप॒ इत्य॑सु॒ऽतृपः॑। उ॒क्थ॒शासः॑। उ॒क्थ॒शस॒ इत्यु॑क्थ॒ऽशसः॑। च॒र॒न्ति॒ ॥३१ ॥

Mantra without Swara
न तँविदाथ यऽइमा जजानान्यद्युष्माकमन्तरम्बभूव । नीहारेण प्रावृता जल्प्या चासुतृपऽउक्थशासश्चरन्ति ॥

न। तम्। विदाथ। यः। इमा। जजान। अन्यत्। युष्माकम्। अन्तरम्। बभूव। नीहारेण। प्रावृताः। जल्प्या। च। असुतृप इत्यसुऽतृपः। उक्थशासः। उक्थशस इत्युक्थऽशसः। चरन्ति॥३१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, ब्रह्माला, (त्याच्या सत्य स्वरूपाला) न जाणणारे लोक (नीहारेण) (प्रावृता:) धुरामुळे जसा अग्नी अथवा धुक्यामुळे जसे पदार्थ झाकले जातात, तसेच लोक अज्ञानरुप अंधकाराने झाकलेले असतात (ते अज्ञानामुळे परमेश्‍वराच्या सत्यरुपाला जाणत नाहीत) आणि (जलप्या) ते व्यर्थच सत्य असत्याच्या वादात अडकून केवळ (असुतृप:) आपल्या प्राणांचे वा शरीराचे पोषण करीत असतात (च) आणि (ते अज्ञानी जन) (उस्थशास:) योगाभ्यासाद्वारे त्या ईश्‍वराला जाणून घ्यायचे सोडून केवळ शब्द-अर्थ विषयक व्यर्थच्या खंडण मंडणात (चरन्ति) गुंतून बसतात, हे मनुष्यांनो, तुम्ही देखील (तम्‌) त्या परमात्म्याला (न) (विदाथ) जाणत नाहीत, (कारण (तुम्हीही वितंडवाद वा खंडण-मंडणात अडकलेले आहात) (य:) जो परमेश्‍वर (इमा) या प्राण्यांना (जजान) उत्पन्न करतो आणि जो ब्रह्म (युष्माकम्‌) तुम्ही अधर्मी, अज्ञानी लोकांच्याजवळ असूनही तुम्हाला (अन्यत्‌) कार्यकारणरूप जगत व जीवांपासून (अंतरम्‌) दूर वाटतो, आणि सर्वामधे व्याप्त असूनही दुरस्य (बभूव) असतो, त्या अतिसूक्ष्म परमात्म्याला तुम्ही जाणत नाहीत. ॥31॥
Essence
भावार्थ - जी माणसें ब्रह्मचर्य आदी व्रतापासून सदाचार, विद्या, योगाभ्यास, धर्मानुष्ठान, सत्संग आणि पुरुषार्थापासून दुरावलेले असतात, ती माणसे स्वत:च्या अज्ञानान्धकारामुळे (सत्य सूक्ष्म) परमेश्‍वराला जाणू शकत नाहीत. ब्रह्म की जो जीवांहून वेगळा आहे, अंतर्यामी, सर्वनियन्ता आणि सर्वव्यापी आहे, त्याला तेच लोक जाणू शकतात की ज्यांचा आत्मा पवित्र आहे. ॥31॥
Subject
पुढील मंत्रातही तोच विषय वर्णित आहे -