Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 3

99 Mantra
17/3
Devata- अग्निर्देवता Rishi- मेधातिथिर्ऋषिः Chhand- विराडार्षी पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
ऋ॒तव॑ स्थऽऋता॒वृध॑ऽऋतु॒ष्ठा स्थ॑ऽऋता॒वृधः॑। घृ॒त॒श्च्युतो॑ मधु॒श्च्युतो॑ वि॒राजो॒ नाम॑ काम॒दुघा॒ऽअक्षी॑यमाणाः॥३॥

ऋ॒तवः॑। स्थ॒। ऋ॒ता॒वृधः॑। ऋ॒त॒वृध॒ इत्यृ॑त॒ऽवृधः॑। ऋ॒तु॒ष्ठाः। ऋ॒तु॒स्था इत्यृ॑तु॒ऽस्थाः। स्थ॒। ऋ॒ता॒वृधः॑। ऋ॒त॒वृध॒ इत्यृ॑त॒ऽवृधः॑। घृ॒त॒श्च्युत॒ इति॑ घृत॒ऽश्च्युतः॑। म॒धु॒श्च्युत॒ इति॑ मधु॒ऽश्च्युतः॑। वि॒राज॒ इति॑ वि॒ऽराजः॑। नाम॑। का॒म॒दुघा॒ इति॑ काम॒दुघा॑। अक्षी॑यमाणाः ॥३ ॥

Mantra without Swara
ऋतव स्थऽऋतावृधऽऋतुष्ठा स्थ ऋतावृधः । घृतश्च्युतो मधुश्च्युतो विराजो नाम कामदुघाऽअक्षीयमाणाः ॥

ऋतवः। स्थ। ऋतावृधः। ऋतवृध इत्यृतऽवृधः। ऋतुष्ठाः। ऋतुस्था इत्यृतुऽस्थाः। स्थ। ऋतावृधः। ऋतवृध इत्यृतऽवृधः। घृतश्च्युत इति घृतऽश्च्युतः। मधुश्च्युत इति मधुऽश्च्युतः। विराज इति विऽराजः। नाम। कामदुघा इति कामदुघा। अक्षीयमाणाः॥३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - ( घरातील पुरुषमंडळीनी घरातील स्त्रियांची केलेली स्तुती वा त्यांच्याकडून केलेली अपेक्षा) हे स्त्रियांनो, (आजी, आई, मुलगी, सासू, सून, जाऊ आदी सर्व स्त्रियांनो,) तुम्ही (ऋतव:) आम्हासाठी वसंत आदी ऋतूंप्रमाणे सुखकारी (स्थ) व्हा. तसेच (ऋतावृध:) पाण्याने भरलेल्या नदीप्रमाणे सत्यवचन व सत्याचरणाने सदैव उन्नती करीत राहा. (ऋतुष्ठा:) वसंत आदी सहाही ऋतूंमधे स्थिर, शांत व निर्भय राहा. ((ऋतुष्ठा:) वसंत आदी सहाही ऋतूंमधे स्थिर, शांत व निर्भय राहा (ऋतुष्ठा:) वसंत आदी सहाही ऋतूंमधे स्थिर, शांत व निंर्भय राहा. (ऋतावृध:) तुम्हा सत्याची वृद्धी करणाऱ्या आहात. (घृतश्‍च्युत:) दही-लोण्यातून तूप तयार करणाऱ्या आणि (मधुश्‍च्युत:) अनेक मधुर रस (फळांचा) गाळणाऱ्या आहात. (या तुमच्या सद्गुणांमुळे) (अक्षीयमाणा:) तुम्ही रक्षणीय व प्रिय आहात. (विराल:) विविध गुणांमुळे प्रशंसनीय व कीर्तीमान असून तुम्ही (कामदुधा:) कामना पूर्ण करणाऱ्या (नाम) गायीप्रमाणे व्हा आणि आम्हाला (घरातील सर्वांना) आनंदी ठेवा, (आम्ही तुमच्याकडून अशी आशा बाळगत आहोत) ॥3॥
Essence
भावार्थ- या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे ज्याप्रमाणे ऋतू आणि गायी योग्यवेळी सर्व काही अनुकूलता प्रदान करतात, आणि सर्व प्राण्यांना सुखी करतात, त्याप्रमाणे सदाचारी, सद्गुणी स्त्रियांनी आपले पती आदी घरातील सर्व पुरुषांना सदा सन्तुष्ट व प्रसन्न ठेवावे. ॥3॥
Subject
स्त्रियांनी आपल्या पतीशी (व घरातील इतरांशी) कसे वागावे, पुढील मंत्रात याविषयी विवेचन केले आहे -