Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 27

99 Mantra
17/27
Devata- विश्वकर्मा देवता Rishi- भुवनपुत्रो विश्वकर्मा ऋषिः Chhand- निचृदार्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
यो नः॑ पि॒ता ज॑नि॒ता यो वि॑धा॒ता धामा॑नि॒ वेद॒ भुव॑नानि॒ विश्वा॑। यो दे॒वानां॑ नाम॒धाऽएक॑ऽए॒व तꣳ स॑म्प्र॒श्नं भुव॑ना यन्त्य॒न्या॥२७॥

यः। नः॒। पि॒ता। ज॒नि॒ता। यः। वि॒धा॒तेति॑ विऽधा॒ता। धामा॑नि। वेद॑। भुव॑नानि। विश्वा॑। यः। दे॒वाना॑म्। ना॒म॒धा इति॑ नाम॒ऽधाः। एकः॑। ए॒व। तम्। स॒म्प्र॒श्नमिति॑ सम्ऽप्र॒श्नम्। भुव॑ना। य॒न्ति॒। अ॒न्या ॥२७ ॥

Mantra without Swara
यो नः पिता जनिता यो विधाता धामानि वेद भुवनानि विश्वा । यो देवानान्नामधाऽएक एव तँ सम्प्रश्नम्भुवना यन्त्यन्या ॥

यः। नः। पिता। जनिता। यः। विधातेति विऽधाता। धामानि। वेद। भुवनानि। विश्वा। यः। देवानाम्। नामधा इति नामऽधाः। एकः। एव। तम्। सम्प्रश्नमिति सम्ऽप्रश्नम्। भुवना। यन्ति। अन्या॥२७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (विद्वान सर्व लोकांस सांगत आहे) हे मनुष्यांनो, (य:) जो परमेश्‍वर (न:) आम्हा सर्वांचा (पिता पालनकर्ता आणि (जनिता) सर्व पदार्थ उत्पन्न करणारा (जगनिर्माता) आहेत, (य:) जो (विधाता) कर्माप्रमाणे फळ देणारा आणि सृष्टी उत्पत्ती करणारा असून जो (विश्‍वा) सर्व (भुवननि) लोक-लोकांतराचे (धामानि) स्थान, (ग्रह-उपग्रह, लोक-लोकांतराची उत्पत्ती कशी झाली, त्यांची स्थिती-गती-कार्य आदी कसे आहेत, त्यांची संख्या आणि नाम, हे सर्व जो) (वेद) जाणतो, (य:) जो (देवानाम्‌) विद्वानांना अथवा पृथ्वी आदी पदार्थांना (नामचा:) आपल्या विद्येद्वारे नाम देणारा आहे आणि (एक:) जो एकमेव असून कोणाच्या साहाय्याची ज्याला आवश्‍यकता नाही, त्याच परमेश्‍वराला (अन्या) (त्याच्याहून वेगळे) असे जे इतर (भुवना) लोक आणि पदार्थ आहेत, ते (यन्ति) प्राप्त होतात, (प्रलयकाळात सर्व लोक-लोकांतर व पदार्थ त्याच परमेश्‍वरात लय होतात) (संप्रश्‍नम्‌) अशा त्या परमेश्‍वराविषयी, हे मनुष्यांनो, तुम्ही मला (विद्वानाला) स्पष्टपणे विचारा आणि (तम्‌) त्याला (त्याच्या सत्य, सधिदान्द रुपाला) यथावत जाणा ॥27॥
Essence
भावार्थ - तो परमेश्‍वर पित्याप्रमाणे समग्र विश्‍वाचे पालन करीत असून तोच सर्वांना जाणणारा (सर्व सृष्टी आणि पदार्थांचे ज्ञान असणारा) आहे. सर्व मनुष्यांनी त्याच्या विषयी आणि त्याने निर्माण केलेल्या सृष्टीविषयी चर्चा करावी, आपसात प्रश्‍न-उत्तर करीत त्याच्या विषयी चर्चा करावी, आपसात, प्रश्‍न-उत्तर करीत त्याच्या विषयी अधिकाधिक जाणावे ॥27॥
Subject
पुनश्‍च, तोच विषय (ईश्‍वराचे स्वरूप) पुढील मंत्रात –