Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 25

99 Mantra
17/25
Devata- विश्वकर्मा देवता Rishi- भुवनपुत्रो विश्वकर्मा ऋषिः Chhand- आर्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
चक्षु॑षः पि॒ता मन॑सा॒ हि धीरो॑ घृ॒तमे॑नेऽअजन॒न्नम्न॑माने। य॒देदन्ता॒ऽअद॑दृहन्त॒ पूर्व॒ऽआदिद् द्यावा॑पृथि॒वीऽअ॑प्रथेताम्॥२५॥

चक्षु॑षः। पि॒ता। मन॑सा। हि। धीरः॑। घृ॒तम्। ए॒न॒ऽइत्ये॑ने। अ॒ज॒न॒त्। नम्न॑माने॒ऽइति॒ नम्न॑माने। य॒दा। इत्। अन्ताः॑। अद॑दृहन्त। पूर्वें॑। आत्। इत्। द्यावा॑पृथि॒वी। अ॒प्र॒थे॒ता॒म् ॥२५ ॥

Mantra without Swara
चक्षुषः पिता मनसा हि धीरो घृतमेनेऽअजनन्नम्नमाने । यदेदन्ताऽअददृहन्त पूर्वऽआदिद्द्यावापृथिवीऽअप्रथेताम् ॥

चक्षुषः। पिता। मनसा। हि। धीरः। घृतम्। एनऽइत्येने। अजनत्। नम्नमानेऽइति नम्नमाने। यदा। इत्। अन्ताः। अददृहन्त। पूर्वें। आत्। इत्। द्यावापृथिवी। अप्रथेताम्॥२५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (एक विद्वान प्रजाजनांना उद्देशून सांगत आहे) हे प्रजाजन हो, तुम्ही (चक्षुष:) तुम्हाला न्याय्य मार्ग दाखविणाऱ्या, (पिता) तुमचे पालन करणाऱ्या आणि (मनसा) योगाभ्यासाद्वारे अंत:करण शुद्ध केलेल्या (धीर:) धैर्यवान (पुरुषाला आपला राजा वा सभाध्यक्ष नेमा) आणि ज्याप्रमाणे (घृतम्‌) (दह्यातून) तूप (अजनत्‌) निघते, प्रकट होते, (त्याप्रमाणे त्या धीर-वीर मनुष्याला (राजा निवडून त्यास सर्व अधिकार द्या. अशा प्रकारे (ऐन) राजा आणि प्रजाजन (नम्नमाने) विनम्र वा सहकारी होऊन (पूर्वे) पूर्वी झालेल्या (सजा व प्रजाजनांप्रमाणे) आणि (द्यावापृथिवी) जसे प्रकाश (आकाश) आणि पृथ्वी आपसात मिसळलेले वा संबद्ध आहेत, त्याप्रमाणे तुम्ही दोघेही (अप्रथेताम्‌) प्रसिद्ध व्हा. (राजा व प्रजा यांनी एकमेकाशी सहकार्य करावे) (हत्‌) आणि (यदा) जेंव्हा-जेव्हां दोघे (अन्ता:) शरीराच्या अवयवांप्रमाणे (वागतील), तेव्हा ते (अददृहन्त) वृद्धीस वा प्रगतीस प्राप्त होतील. आणि (आत्‌) त्यानंतरच दोघे (इत्‌) निश्‍चयाने स्थिर राज्याचा उपभोग करतात. (तुम्ही प्रजाजनदेखील राजाशी असेच सहकार्याने वागा म्हणजे राज्य स्थिर व स्थायी राहील ॥25॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जेव्हां (राष्ट्राचे नागरिक) राजा आणि प्रजाजन एकमेकाशी सहकार्य करीत, एकमत होऊन आचरण करतील, तेव्हाच ते राज्य (वा राष्ट्र) सूर्य आणि पृथ्वीप्रमाणे स्थिर (स्थायी आणि सुखदायक होईल (सूर्य आणि पृथ्वी एकमेकाशी सहकार्य करतात, तद्वत तुम्ही करा) ॥25॥
Subject
पुनश्‍च, तोच विषय -