Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 24

99 Mantra
17/24
Devata- विश्वकर्मा देवता Rishi- भुवनपुत्रो विश्वकर्मा ऋषिः Chhand- निचृदार्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
विश्व॑कर्मन् ह॒विषा॒ वर्द्ध॑नेन त्रा॒तार॒मिन्द्र॑मकृणोरव॒ध्यम्। तस्मै॒ विशः॒ सम॑नमन्त पू॒र्वीर॒यमु॒ग्रो वि॒हव्यो॒ यथास॑त्॥२४॥

विश्व॑कर्म॒न्निति॒ विश्व॑ऽकर्मन्। ह॒विषा॑। वर्द्ध॑नेन। त्रा॒तार॑म्। इन्द्र॑म्। अ॒कृ॒णोः॒। अ॒व॒ध्यम्। तस्मै॑। विशः॑। सम्। अ॒न॒म॒न्त॒। पू॒र्वीः। अ॒यम्। उ॒ग्रः। वि॒हव्य॒ इति॑ वि॒ऽहव्यः॑। यथा॑। अस॑त् ॥२४ ॥

Mantra without Swara
विश्वकर्मन्हविषा वर्धनेन त्रातारमिन्द्रमकृणोरवध्यम् । तस्मै विशः समनमन्त पूर्वीरयमुग्रो विहव्यो यथासत् ॥

विश्वकर्मन्निति विश्वऽकर्मन्। हविषा। वर्द्धनेन। त्रातारम्। इन्द्रम्। अकृणोः। अवध्यम्। तस्मै। विशः। सम्। अनमन्त। पूर्वीः। अयम्। उग्रः। विहव्य इति विऽहव्यः। यथा। असत्॥२४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (विश्‍वकर्मन्‌) सर्व शुभकर्म करणारे, सर्व सभांचे पती (राज्यसभा, धर्मार्थ सभा, विद्यार्थी सभा आदी सभांचे अध्यक्ष) हे राजा, आपण (हविषा) स्वीकार करण्यास योग्य (सर्वथा पात्र) आणि (वर्द्धनेन) सतत वृद्धी वा उन्नती करणाऱ्या (अवध्यम्‌) हिंसा करण्यास योग्य (ज्याचा वध करू नये) आणि (त्रातारम्‌) सर्वांचे रक्षण करणाऱ्या (इन्द्रम्‌) श्रेष्ठ संपत्तिशाली व्यक्तीला तसेच राज्यकार्यासाठी तुम्हाला (सल्ला देणाऱ्या मनुष्याला आपला मंत्री (अकृणो:) नेमा. (तस्मै) त्याच्याकरिता (पूर्वी:) पूर्वी झालेल्या न्यायाधीशांनी (विश:) ज्या प्रजेला (समनमन्त) चांगल्याप्रकारे नम्र व सुजाण केले आहे (तशा प्रकारे तुम्हीही प्रजाजनांना सदाचारी व परिश्रमी बनवा) (यथा) (याशिवाय असे कार्य साधनें करा की) ज्यायोगे (अयम्‌) ह तुमचा मंत्री (उग्र:) (दंडित करण्याच्या कामी कठोर) वा उग्र होईल (तसेच ही) (विहव्य:) विविध साधनांनी संपन्न (असत्‌) होईल, असे करा. ॥24॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. राज्यार्थसभा, विद्यार्थसभा आदी सर्व सभांचे सभाध्यक्ष तसेच सर्व सभासद, यांचे कर्तव्य आहे की त्यानी अशाच व्यक्तीला राज्याधिकार द्यावा (वा राजा म्हणून नेमावे) की जो पक्षपाती नसावा. पिता जसा पुत्राशी त्याप्रमाणे जो मनुष्य प्रजेशी वागत नसले व तिचे रक्षण करीत नसेल, त्या व्यक्तीस प्रजेने मुळीच मान्यता देऊ नये. जो मनुष्य आपल्या पुत्राप्रमाणे प्रजेचे न्याय मार्गाने रक्षण करणारा असेल, प्रजेने त्याच्याशी अनुकूलतेने वागावे ॥24॥
Subject
लोकांनी (वा नागरिकांनी) कोणत्या व कशा व्यक्तीस राजा म्हणून मानावे (वा निवडून द्यावे) याविषयी-