Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 21

99 Mantra
17/21
Devata- विश्वकर्मा देवता Rishi- भुवनपुत्रो विश्वकर्मा ऋषिः Chhand- आर्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
या ते॒ धामा॑नि पर॒माणि॒ याऽव॒मा या म॑ध्य॒मा वि॑श्वकर्मन्नु॒तेमा। शिक्षा॒ सखि॑भ्यो ह॒विषि॑ स्वधावः स्व॒यं य॑जस्व त॒न्वं वृधा॒नः॥२१॥

या। ते॒। धामा॑नि। प॒र॒माणि॑। या। अ॒व॒मा। या। म॒ध्य॒मा। वि॒श्व॒क॒र्म॒न्निति॑ विश्वऽकर्मन्। उ॒त। इ॒मा। शिक्ष॑। सखि॑भ्य॒ इति॒ सखि॑ऽभ्यः। ह॒विषि॑। स्व॒धा॒व॒ इति॑ स्वधाऽवः। स्व॒यम्। य॒ज॒स्व॒। त॒न्व᳖म्। वृ॒धा॒नः ॥२१ ॥

Mantra without Swara
या ते धामानि परमाणि यावमा या मध्यमा विश्वकर्मन्नुतेमा । शिक्षा सखिभ्यो हविषि स्वधावः स्वयँयजस्व तन्वँवृधानः ॥

या। ते। धामानि। परमाणि। या। अवमा। या। मध्यमा। विश्वकर्मन्निति विश्वऽकर्मन्। उत। इमा। शिक्ष। सखिभ्य इति सखिऽभ्यः। हविषि। स्वधाव इति स्वधाऽवः। स्वयम्। यजस्व। तन्वम्। वृधानः॥२१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (उपासक म्हणतात) (स्वधाव:) अनेक प्रकारच्या धान्यादींचे दाता (विश्‍वकर्मन्‌) हे सर्व श्रेष्ठ कर्म करणाऱ्या परमेश्‍वरा, (ते) तुझ्या या सृष्टीमध्ये (या जी (अवमा) निकृष्ट (या) जी (मध्यमा) मध्यम कोटीची (धामानि) सर्व पदार्थांची आधारभूत स्थाने आहेत अथवा वेगवेगळ्या नामांचे पदार्थ आहेत (इमा) या सर्व पदार्थांना वा ते सर्व पदार्थ (हविषि) धन-प्रतिदान अथवा कार्य-व्यवहारासाठी (स्वयम्‌) आपण स्वत: (यजस्व) आमच्याकरिता प्राप्त करून द्या (आम्हांस उपयोगी पदार्थ देण्याची कृपा करा) (उत) आणि आमच्या (तन्वम्‌) शरीरांची (वृधान:) वृद्धी वा पृष्टी करीत (सखिभ्य:) आपल्या आज्ञेचे पालन करणाऱ्या आम्हा (उपासकगणांना-आम्हा मित्रांना) (शिक्ष) शुभगुणांचा उपदेश करा (आमच्या बुद्धीत सद्गुणांविषयी प्रेरणा करा) ॥21॥
Essence
भावार्थ - ज्याप्रमाणे या जगात परमेश्‍वराने निकृष्ट, मध्यम आणि उत्तम पदार्थ व स्थान उत्पन्न केले आहेत, त्याप्रमाणेच राज्याच्या सभापती राजाला पाहिजे की त्याने तीन प्रकारचे स्थान निर्मित करावेत. त्या स्थानांत आवश्‍यक त्या वस्तू वस्तूंची उपलब्धता करावी. ब्रह्मचर्याचे पालन (स्वत: करून प्रजाजनाला करण्यास प्रवृत्त करून) शारीरिक शक्ती वाढवून मित्रांना (सज्जनांना) उत्तम शिक्षण देऊन ऐश्‍वर्यवान करावे ॥21॥
Subject
पुढील मंत्रात तोच विषय