Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 18

99 Mantra
17/18
Devata- विश्वकर्मा देवता Rishi- भुवनपुत्रो विश्वकर्मा ऋषिः Chhand- भुरिगार्षी पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
किस्वि॑दासीदधि॒ष्ठान॑मा॒रम्भ॑णं कत॒मत् स्वि॑त् क॒थासी॑त्। यतो॒ भूमिं॑ ज॒नय॑न् वि॒श्वक॑र्मा॒ वि द्यामौर्णोन्महि॒ना वि॒श्वच॑क्षाः॥१८॥

किम्। स्वि॒त्। आ॒सी॒त्। अ॒धि॒ष्ठान॑म्। अ॒धि॒स्थान॒मित्य॑धि॒ऽस्थान॑म्। आ॒रम्भ॑ण॒मित्या॒ऽरम्भ॑णम्। क॒त॒मत्। स्वि॒त्। क॒था। आ॒सी॒त्। यतः॑। भूमि॑म्। ज॒नय॑न्। वि॒श्वक॒र्मेति॑ वि॒श्वऽक॑र्मा। वि। द्याम्। और्णो॑त्। म॒हि॒ना। वि॒श्वच॑क्षा॒ इति॑ वि॒श्वऽच॑क्षाः ॥१८ ॥

Mantra without Swara
किँ स्विदासीदधिष्ठानमारम्भणङ्कतमत्स्वित्कथासीत् । यतो भूमिञ्जनयन्विश्वकर्मा वि द्याऔर्णान्महिना विश्वचक्षाः ॥

किम्। स्वित्। आसीत्। अधिष्ठानम्। अधिस्थानमित्यधिऽस्थानम्। आरम्भणमित्याऽरम्भणम्। कतमत्। स्वित्। कथा। आसीत्। यतः। भूमिम्। जनयन्। विश्वकर्मेति विश्वऽकर्मा। वि। द्याम्। और्णोत्। महिना। विश्वचक्षा इति विश्वऽचक्षाः॥१८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - 18 वा मंत्र - (एक जिज्ञासू मनुष्य विद्वानासमोर जिज्ञासा व्यक्त करीत आहे) हे विद्वान महोदय, (मला हे सांगा की) या जगाचा (अधिष्ठानम्‌) आधार (किं, स्वित्‌) काय (आसीत्‌) आहे (हे आश्‍चर्य काय आहे?) तसेच (आरम्भणम्‌) या जगाचा आरंभ वा या कार्यरुप जगताचे आरंभीत कारण (कतमत्‌) काय आहे (वा होतो?) अर्थात अनेक उपादान कारणांमधे ते कोणते कारण होते? (तसेच ते कारण) (कथा) कोणत्या रुपात (स्वित्‌) कोणत्या तर्कयुक्त स्थितीत (आसीत्‌) आहे (वा होते?) (तसेच हे ही सांगा की) (यत:) ते काय आहे की ज्यामुळे (विश्‍वकर्मा) सर्व कारण करणारा (मुख्य कारण) (विश्‍चक्षा:) सर्व जगाचा द्रष्टा जगदीश्‍वर (भूमिम्‌) पृथ्वी आणि (द्याम्‌) सूर्य आदी लोकांची (जनथन्‌) उत्पत्ती करीत (महिम्ना) आपल्या महिमेमुळे (सामर्थ्य व शक्तीमुळे) (व्यौर्णोत्‌) विविध प्रकारे कसा व्यापून राहिला आहे? (प्रकृति उपादान कारण आणि परमेश्‍वर निमित्त कारण होते व आहे. तोच सर्व लोक, ग्रह, उपग्रह आदींचा आधार आहे) ॥18॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, (तुम्हाला हे जाणून घ्यायची इच्छा असेल) की हे जग कुठे व कसे आह? या जगाचे कारण काय? आणि हे जग का उत्पन्न झाले? तर या प्रश्‍नांचे उत्तर असे की जो जगदीश्‍वर (मूळ कारण असून) या कार्यरुप जगाला तोच उत्पन्न करतो आणि सर्वव्यापी असल्यामुळे आपल्या व्याप्तित्वाद्वारे तो सर्व (पदार्थ, लोक, सूर्यादींना) आच्छादित करीत आहे. सर्वज्ञ असल्यामुळे तो सर्व काही पाहतो. तोच जगदाधार आणि निमित्त कारण आहे. तो सर्वाशक्तीमान असून आपल्या रचना आदी सामर्थ्यांमुळे पूर्ण सामर्थ्यवान आहे. (त्याने हे जग का उत्पन्न केले, त्याचे उत्तर असे की (सर्व जीवात्मांना त्यांच्या पाप-पुण्याचे फळ देण्यासाठी आणि ते फळ भोगण्यासाठी त्याने या जगाची रचना केली आहे. हे सर्व नीट समजून व जाणून घ्या. ॥18॥
Subject
पुनश्‍च, पुढील मंत्रात तोच विषय (ईश्‍वराचे स्वरूप) कथित आहे कि –