Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 15

99 Mantra
17/15
Devata- अग्निर्देवता Rishi- लोपामुद्रा ऋषिः Chhand- विराडार्षी पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
प्रा॒ण॒दाऽअ॑पान॒दा व्या॑न॒दा व॑र्चो॒दा व॑रिवो॒दाः। अन्याँ॒स्ते॑ऽअ॒स्मत्त॑पन्तु हे॒तयः॑ पाव॒कोऽअ॒स्मभ्य॑ꣳ शि॒वो भ॑व॥१५॥

प्रा॒ण॒दा इति॑ प्राण॒ऽदाः। अ॒पा॒न॒दा इत्य॑पान॒ऽदाः। व्या॒न॒दा इति॑ व्यान॒ऽदाः। व॒र्चो॒दा इति॑ वर्चः॒ऽदाः। व॒रि॒वो॒दा इति॑ वरिवः॒ऽदाः। अ॒न्यान्। ते॒। अ॒स्मत्। त॒प॒न्तु॒। हे॒तयः॑। पा॒व॒कः। अ॒स्मभ्य॑म्। शि॒वः। भ॒व॒ ॥१५ ॥

Mantra without Swara
प्राणदाऽअपानदा व्यानदा वर्चादा वरिवोदाः । अन्याँस्तेऽअस्मत्तपन्तु हेतयः पावकोऽअस्मभ्यँ शिवो भव ॥

प्राणदा इति प्राणऽदाः। अपानदा इत्यपानऽदाः। व्यानदा इति व्यानऽदाः। वर्चोदा इति वर्चःऽदाः। वरिवोदा इति वरिवःऽदाः। अन्यान्। ते। अस्मत्। तपन्तु। हेतयः। पावकः। अस्मभ्यम्। शिवः। भव॥१५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (प्रजाजन म्हणतात) हे विद्वान राजा, (ते) आपला जो उत्कर्ष, प्रगती अथवा शस्त्रसामर्थ्य आहे ते (अस्मभ्यम्‌) आमच्यासाठी (प्राणदा:) आयुष्य व शक्ती (देणारे ठरो.) आपले सामर्थ्य आम्हा प्रजाजनांकरिता (अपानदा:) दु:खनिवारक साधने देणारे आणि (न्यानदा:) विकास आणि विज्ञान देणारे होवो. आपले सामर्थ्य आम्हास (वरिवोदा:) सत्याचरण आणि विद्वज्जनसेवा (शिकविणारे होवो.) आपले (हेतय:) वज्र आदी अस्त्र-शस्त्रांचा, शक्तीचा वापर (आमच्यावर होऊ नये, तर) (अस्मत्‌) आमच्याहून वेगळे वा भिन्न जे (अन्यान्‌) अन्य दुष्ट-दुर्जन आहेत, त्यांना तुमचे ते शस्त्र (तुपन्तु) भीतिदायक वा विनाशकारी ठरो. (पावक:) शुद्धता आणि पावित्र्य यांचा विस्तार करणारे आणि आमच्यासाठी (शिव:) मंगलकारी (भव) व्हा. ॥15॥
Essence
भावार्थ - राजा तोच म्हणावा की जो न्यायाने वागणारा आणि न्यायाची वृद्धी करणारा आहे. तसेच विद्वानदेखील तोच की जो आपल्या ज्ञानाद्वारे न्यायाची नीट माहिती सांगणारा (न्याय काय आणि अन्याय काय? हे जाणणारा) आहे. (याशिवाय त्या जो याविरूद्ध वागतो त्यास राजा व विद्वान म्हणू नये.) जो प्रजेस पीडित करतो तो राजा नाही आणि जो इतरांना ज्ञान देऊन त्याना ज्ञानी विद्वान करीत नाही, त्यास विद्वान म्हणून नये. तसे प्रजाजन देखील त्यासच म्हणावे की जो नीतिमान राजाची सेवा करतो. ॥15॥
Subject
विद्वान आणि राजा, यांनी कसे असावे, पुढील मंत्रात याविषयी प्रतिपादन केले आहे –