Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 13

99 Mantra
17/13
Devata- प्राणो देवता Rishi- लोपामुद्रा ऋषिः Chhand- निचृदार्षी जगती Swara- षड्जः
Mantra with Swara
ये दे॒वा दे॒वानां॑ य॒ज्ञिया॑ य॒ज्ञिया॑ना संवत्स॒रीण॒मुप॑ भा॒गमास॑ते। अ॒हु॒तादो॑ ह॒विषो॑ य॒ज्ञेऽअ॒स्मिन्त्स्व॒यं पि॑बन्तु॒ मधु॑नो घृ॒तस्य॑॥१३॥

ये। दे॒वाः। दे॒वाना॑म्। य॒ज्ञियाः॑। य॒ज्ञिया॑नाम्। सं॒व॒त्स॒रीण॑म्। उप॑। भा॒गम्। आस॑ते। अ॒हु॒ताद॒ इत्य॑हुत॒ऽअदः॑। ह॒विषः॑। य॒ज्ञे। अ॒स्मिन्। स्व॒यम्। पि॒ब॒न्तु॒। मधु॑नः। घृ॒तस्य॑ ॥१३ ॥

Mantra without Swara
ये देवा देवानाँयज्ञिया यज्ञियानाँ सँवत्सरीणमुप भागमासते । अहुतादो हविषो यज्ञेऽअस्मिन्त्स्वयम्पिबन्तु मधुनो घृतस्य ॥

ये। देवाः। देवानाम्। यज्ञियाः। यज्ञियानाम्। संवत्सरीणम्। उप। भागम्। आसते। अहुताद इत्यहुतऽअदः। हविषः। यज्ञे। अस्मिन्। स्वयम्। पिबन्तु। मधुनः। घृतस्य॥१३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (ये) जी माणसें (देवानाम्‌) विद्वज्जनांपैकी (अहुताद:) हवन न करता अन्नग्रहण करणारे असतात (म्हणजे संन्यासीगण की ज्यांना शास्त्राज्ञेप्रमाणे दैनिक होम व पंचयज्ञ करणे बंधनकारक नाही.) त्यानी मधु, धृत, फळें आदी पदार्थांचे सेवन करावे) याशिवाय (याज्ञियानाम्‌) यज्ञ कार्यात कुशल असे (देवो:) विद्वान आहेत, ते (याज्ञिया:) योगाभ्यासरूप यज्ञ करण्यासाठी पात्र असलेल्या जिज्ञासू लोकांसाठी (संवत्सरीणाम्‌) वर्षभर ते अध्यापन रुप यज्ञ करतात आणि (भागम्‌) सेवनीय वा उपासनीय सर्वोत्तम परमेश्‍वराची (उपासते) उपासना करतात. (अस्मित्‌) या (यज्ञे) समागम वा सत्संगरूप यज्ञामध्ये त्या अहुताद संन्यासीजनांनी (मधुन:) मध (घृप्तस्य) घृत आणि (हविष:) अन्य हवनीय द्रव्यांचा यशोचित भाग द्यावा (लोकाना ज्ञान व उपदेश द्यावा) आणि (स्वयम्‌) स्वयंदेखी त्या (उपदेश आणि उपासनारुप) यज्ञाचे (पिवन्तु सेवन करावे ॥13॥
Essence
भावार्थ - जे विद्वान लोक या संसारात अग्निहोत्र आदी कृत्यापासून मुक्त आहेत म्हणजे ज्यांना आहवनीय गार्हपत्य व दक्षिणाग्नी विषयक बाह्य कर्म करणे आवश्‍यक नसून केवल आभ्यन्तर अग्नी (मनन, चिंतन, ध्यान, उपासना आदी कर्म) धारण केला पाहिजे, त्या संन्यासीजनांनी होम-हवन न करता भोजन करीत, सर्वत्र विचरण करीत सर्व मनुष्यांना वेदार्थाचा उपदेश करावा (त्यांच्यासाठी हेच आचरण विधेय आहे) ॥13॥
Subject
पुढील मंत्रात संन्यासी लोकांची कर्तव्यें काय, याविषयी कथन केले आहे –