Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 12

99 Mantra
17/12
Devata- अग्निर्देवता Rishi- लोपामुद्रा ऋषिः Chhand- निचृद गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
नृ॒षदे॒ वेड॑प्सु॒षदे॒ वेड् ब॑र्हि॒षदे॒ वेड् व॑न॒सदे॒ वेट् स्व॒र्विदे॒ वेट्॥१२॥

नृ॒षदे॑। नृ॒सद॒ इति॑ नृ॒ऽसदे॑। वेट्। अ॒प्सु॒षदे॑। अ॒प्सु॒सद॒ इत्य॑प्सु॒ऽसदे॑। वेट्। ब॒र्हि॒षदे॑। ब॒र्हि॒सद इति॑ बर्हि॒ऽसदे॑। वेट्। व॒न॒सद॒ इति॑ वन॒ऽसदे॑। वेट्। स्व॒र्विद॒ इति॑ स्वः॒ऽविदे॑। वेट् ॥१२ ॥

Mantra without Swara
नृषदे वेडप्सुषदे वेड्बर्हिषदे वेड्वनसदे वेट्स्वर्विदे वेट् ॥

नृषदे। नृसद इति नृऽसदे। वेट्। अप्सुषदे। अप्सुसद इत्यप्सुऽसदे। वेट्। बर्हिषदे। बर्हिसद इति बर्हिऽसदे। वेट्। वनसद इति वनऽसदे। वेट्। स्वर्विद इति स्वःऽविदे। वेट्॥१२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (प्रजाजन म्हणतात) हे सभापती (न्यायाधीश वा राष्ट्राध्यक्ष) आपण (नृषदे) नायक (सरदार, विभागाध्यक्ष आदी) च्या सभेत प्रमुख पुरुष आहात. (वेट्) न्यायासनावर बसण्यास आणि (अप्सुषदे) पाण्यावर चालणाऱ्या वाहनांचे नियंत्रक असून त्याविषयीच्या (वेट्) न्यायप्रकरणात निर्णय देणारे आहात. (बर्हिषदे) प्रजेच्या उत्कर्षासाठी कटिबद्ध व त्याविषयी (वेट्) सक्षम अधिकारी आहात तसेच आपण (वनसदे) वनवासी लोकांसाठी (वेट्) योग्य ते न्याय देण्यास (वा त्यांच्या प्रगतीसाठी कार्य करण्यात) समर्थ आहात. म्हणून आपणास विनंती की (स्वर्विदे) सुख इच्छिणाऱ्या मनुष्यांनाकरिता तुम्ही (वेट्) उत्साह व प्रेरणा देणारे व्हा ॥12॥
Essence
भावार्थ - ज्या देशात न्यायाधीश (सभापती व राष्ट्राध्यक्ष) नौकानयन-आनयम, प्रजेचा उत्कर्ष, यासाठी जागरूक असतात, तसेच वनवासी लोक आणि सैन्यधिकारी जनांसाठी सुखसोयी करणारे असतात, या देशात सुख व आनंद यांची वृद्धी सतत होत असते ॥12॥
Subject
पुढील मंत्रात तोच विषय (न्यायाधीश, सभापती यांची कर्तव्ये) प्रतिपादित आहे –