Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 10

99 Mantra
17/10
Devata- अग्निर्देवता Rishi- भारद्वाज ऋषिः Chhand- निचृदार्षी Swara- निषादः
Mantra with Swara
पा॒व॒कया॒ यश्चि॒तय॑न्त्या कृ॒पा क्षाम॑न् रुरु॒चऽउ॒षसो॒ न भा॒नुना॑। तूर्व॒न् न याम॒न्नेत॑शस्य॒ नू रण॒ऽआ यो घृ॒णे न त॑तृषा॒णोऽअ॒जरः॑॥१०॥

पा॒व॒कया॑। यः। चि॒तय॑न्त्या। कृ॒पा। क्षाम॑न्। रु॒रु॒चे। उ॒षसः॑। न। भा॒नुना॑। तूर्व॑न्। न। याम॑न्। एत॑शस्य। नु। रणे॑। आ। यः। घृ॒णे। न। त॒तृ॒षा॒णः। अ॒जरः॑ ॥१० ॥

Mantra without Swara
पावकया यश्चितयन्त्या कृपा क्षामन्रुरुचऽउषसो न भानुना । तूर्वन्न यामन्नेतशस्य नू रणऽआ यो घृणे न ततृषाणोऽअजरः ॥

पावकया। यः। चितयन्त्या। कृपा। क्षामन्। रुरुचे। उषसः। न। भानुना। तूर्वन्। न। यामन्। एतशस्य। नु। रणे। आ। यः। घृणे। न। ततृषाणः। अजरः॥१०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (य:) सेनापती (पाककया) पवित्र करणाऱ्या आणि (चितयन्त्या) चैतन्य व उत्साह देणाऱ्या (कृपा) शक्तीने संपन्न आहे (ते सैनिकामधे उत्साह व वीरत्व चेतवितो) जसे (भानुना) सूर्याच्या दीप्तीने (उषस:) प्रभातकाळ उजळून निघतो, (न) तसे हा सेनापती (क्षामन्‌) राज्यभूमीमध्ये (ररुचे) सुशोभित होत आहे. तसेच हा सेनापती (य:) जो (यामन्‌) मार्गामध्ये यावा योग्यवेळी (एतशस्य) घोडदळाचे (नु) अतिशीघ्र (तूर्वन्‌) संचालन करतो. या (न) सेनापतीप्रमाणे (घृणे) भीषण (रणे) युद्धात (तृतषाण:) (न) तहानलेल्या माणूस जसा पाण्याकडे तसा जो कोणी (अजर:) अजर, अजेय आणि निर्भय होऊन (ऊ) शत्रुसैन्यावर तूटून पडतो, तोच वीर माणूस राज्य करण्यात पात्र असतो ॥10॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. (सूर्य आणि घोडा हे दोन उपमा असून सेनापती हा उपयोग आहे) जसे सूर्य आणि घोडा हे दोन उपमान असून सेनापती हा उपमेय आहे) जसे सूर्य आणि चंद्र स्वदीप्तीने शोभित असतात, तद्वत सदाचारी सती स्त्री आपल्या श्रेष्ठ पतीमुळे आणि उत्तम सैन्यामुळे सेनापती सुशोभित होतो. ॥10॥
Subject
सेनापती कसा असावा, याविषयी-