Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 17 / Mantra 1

99 Mantra
17/1
Devata- मरुतो देवताः Rishi- मेधातिथिर्ऋषिः Chhand- भुरिगतिशक्वरी Swara- पञ्चमः
Mantra with Swara
अश्म॒न्नूर्जं॒ पर्व॑ते शिश्रिया॒णाम॒द्भ्यऽओष॑धीभ्यो॒ वन॒स्पति॑भ्यो॒ऽअधि॒ सम्भृ॑तं॒ पयः॑। तां न॒ऽइष॒मूर्जं॑ धत्त मरुतः सꣳररा॒णाऽअश्म॑ꣳस्ते॒ क्षुन् मयि॑ त॒ऽऊर्ग्यं॑ द्वि॒ष्मस्तं ते॒ शुगृ॑च्छतु॥१॥

अश्म॑न्। ऊर्ज॑म्। पर्व॑ते। शि॒श्रि॒या॒णाम्। अ॒द्भ्य इत्य॒त्ऽभ्यः। ओष॑धीभ्यः। वन॒स्पति॑भ्य इति॒ वन॒स्पति॑ऽभ्यः अधि॑। सम्भृ॑त॒मिति॒ सम्ऽभृ॑तम्। पयः॑। ताम्। नः॒। इष॑म्। ऊर्ज॑म्। ध॒त्त॒। म॒रु॒तः॒। स॒ꣳर॒रा॒णा इति॑ सम्ऽरराणाः। अश्म॑न्। ते॒। क्षुत्। मयि॑। ते॒। ऊर्क्। यम्। द्वि॒ष्मः। तम्। ते॒। शुक्। ऋ॒च्छ॒तु॒ ॥१ ॥

Mantra without Swara
अश्मन्नूर्जम्पर्वते शिश्रियाणामद्भ्यऽओषधीभ्यो वनस्पतिभ्योऽअधि सम्भृतम्पयः । तान्नऽइषमूर्जन्धत्त मरुतः सँरराणाः अश्मँस्ते क्षुन्मयि तऽऊर्ग्ययन्द्विष्मस्तन्ते शुगृच्छतु ॥

अश्मन्। ऊर्जम्। पर्वते। शिश्रियाणाम्। अद्भय इत्यत्ऽभ्यः। ओषधीभ्यः। वनस्पतिभ्य इति वनस्पतिऽभ्यः अधि। सम्भृतमिति सम्ऽभृतम्। पयः। ताम्। नः। इषम्। ऊर्जम्। धत्त। मरुतः। सꣳरराणा इति सम्ऽरराणाः। अश्मन्। ते। क्षुत्। मयि। ते। ऊर्क्। यम्। द्विष्मः। तम्। ते। शुक्। ऋच्छतु॥१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (नागरिकांची प्रार्थना) (राष्ट्रातील) उदार, दानशील आणि (मरूत:) वायूप्रमाणे सर्व कार्य संपन्न करण्यात कुशल असलेल्या हे कलाकारांनो (वा यांत्रिकजनानो), तुम्ही (पर्वते) पर्वताप्रमाणे विशाल अशा (अश्‍वम्‌) मेधाच्या (शिश्रियाणाम्‌) अवयवात (कणाकणात) विद्यमान असणार व त्यात स्थायीपणे राहणारी अशी विद्युतपरुप शक्ति तसेच (अर्जम्‌) त्या मेघमंडळात असणारी ऊर्जा आणि त्याद्वारे मिळणारे अन्न-धान्य (न:) आमच्याकरिता (अधि धत्र) पुष्कळ प्रमाणात प्राप्त करा (मेघमंडळात असणाऱ्या विद्युतशक्तीचा उपयोग) सर्व जनतेसाठी ऊर्जा व धान्यादी मिळण्याकरिता होईल, असे करा) तसेच (न:) आमच्याकरिता (अद्भ्य:)) जलाशयांपासून, (औषधिभ्य:) यव आदी औषधीपासून, तसेच (वनस्पतिभ्य:) पिंपळ आदी वनस्पतीपासून (सम्न्यृतम्‌) प्राप्त केलेले (पम:) रस, जल प्राप्त करा. तसेच (इषम्‌) अन्न-धान्य आणि (ऊर्जम्‌) त्यांपासून मिळणारी शक्ती या सर्वांना (न:) आमच्या कल्याणाकरिता धारण करा व पूर्ववर्णित विद्युतशक्तीचा या कार्यासाठी उपयोग करा. हे (कलाकार वा विज्ञानवान) मनुष्या, (ते) तुझ्याजवळ (अश्‍मन्‌) मेघशक्तीविषयी ये (ऊर्क) ज्ञान वा क्रियात्मक विज्ञान आहे, ते तू (मयि) मला दे आणि (पोटातील भूक म्हणजे ज्ञानप्राप्तीविषयीची जी लालसा) (क्षुत) वा भूक (ते) तुझ्यामध्ये आहे, ती व तशी भूक माझ्यामध्येही असावी (दोघानी एकमेकास ज्ञान-विज्ञानाचे आदान-प्रदान करावे) म्हणजे आम्ही सर्वांनी सर्वांच्या सुख-दु:खाला आपले मानून एकमेकाचे सहायक व्हावे. याशिवाय (यम्‌) ज्या दुष्ट-दुर्जनाचा आम्ही (इतर नागरिक) (द्विष्म:) द्वेष करतो (त्याच्या विनाशासाठी यत्न करतो) (तम्‌) त्या दुष्टांना (ते) तुमचा (तुम्ही वैज्ञानिकांचा) (शुक्‌) शोक (ऋच्छतु) प्राप्त होवो. (तुमच्या ठिकाणी जे दु:ख वा शोक असले, तो दुर्जनांना होवो. तुम्ही व आम्ही सदा सुखी असावेत.) ॥1॥
Essence
भावार्थ - सर्व मनुष्यांचे हे कर्तव्य आहे की ज्यांनी सूर्याप्रमाणे आचरण करावे. सूर्य सरोवर, नदी आणि औषधींचा रस शोषित करून तो रस मेघमंडलात स्थापित करतो आणि त्या रसाला वृष्टीरुपाने पुन्हा भूमीला देतो, त्या वृष्टीरसाने वनस्पती धान्य आदी पदार्थ उगवतात, ते अन्न खाऊन क्षुधेची निवृत्ती होते, क्षुधा-निवृत्तीमुळे बळ वाढते, त्या बळाद्वारे शत्रू व दुष्टांचे निवारण करणे शक्य होतो आणि दुष्ट विनाशामुळे सज्जनांचे दु:ख व शोक नष्ट होतात. सूर्याप्रमाणे सर्वजणांनी दुसऱ्यांचे सुख-दु:ख आपले मानावे, तसेच सर्वांनी एकमेकाशी मित्राप्रमाणे राहावे. एकमेकाचे दु:ख दूर करण्यास साहाय्यभूत व्हावे आणि स्वत:च्या व इतरांचा निरंतर उत्कर्ष साधावा. ॥1॥
Subject
आता सतराव्या अध्यायाच्या आरंभ केला जात आहे. या अध्यायाच्या पहिल्या मंत्रात वृष्टीविद्येविषयी उपदेश केला आहे -