Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 63

66 Mantra
16/63
Devata- रुद्रा देवताः Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्वा देवा ऋषयः Chhand- भुरिगार्ष्युष्णिक् Swara- गान्धारः
Mantra with Swara
यऽए॒ताव॑न्तश्च॒ भूया॑सश्च॒ दिशो॑ रु॒द्रा वि॑तस्थि॒रे। तेषा॑ सहस्रयोज॒नेऽव॒ धन्वा॑नि तन्मसि॥६३॥

ये। ए॒ताव॑न्तः। च॒। भूया॑सः। च॒। दिशः॑। रु॒द्राः। वि॒त॒स्थि॒र इति॑ विऽतस्थि॒रे। तेषा॑म्। स॒ह॒स्र॒यो॒ज॒न इति॑ सहस्रऽयोज॒ने। अव॑। धन्वा॑नि। त॒न्म॒सि॒ ॥६३ ॥

Mantra without Swara
ये एतावन्तश्च भूयाँसश्च दिशो रुद्रा वितस्थिरे । तेषाँ सहस्रयोजने व धन्वानि तन्मसि ॥

ये। एतावन्तः। च। भूयासः। च। दिशः। रुद्राः। वितस्थिर इति विऽतस्थिरे। तेषाम्। सहस्रयोजन इति सहस्रऽयोजने। अव। धन्वानि। तन्मसि॥६३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (यो) जे किंवा ज्यांचे (एतावन्त:) आतापर्यंत वर्णन केले आहे (च) आणि (रूद्रा:) ज्या प्राणांचे (वायूंचे) वा जीवांचे वर्णन केले आहे (भूयांस:) त्यांच्यापेक्षा अधिक जे जे वायू वा जीव (दिश:) पूर्व आदी दिशांमध्ये (वितास्थिरे) स्थिर आहेत अथवा विद्यमान आहेत, (तेयाम्) त्यांच्या (सहस्रयोजने) हजार योजन विस्तृत देशात (धन्वानि) आकाशातदेखील आम्ही (आपल्या अस्त्रशस्त्रादींना) (अव, तन्मसि) विस्तृत करतो. (आकाश, समुद्र, भूमी यांवर विद्यमान सर्व वायू आणि प्राण्यांच्या रक्षणासाठी आम्ही (सैनिक) आपले अस्त्र-शस्त्र वापरतो. ॥63॥
Essence
भावार्थ - जी माणसे सर्व दिशांमधे विद्यमान प्राण्यांचा आणि वायूंचा (आपल्या हितासाठी) यथोचित उपयोग करतात (मनुष्यबळ आणि ऊर्जाशक्ती यांच्यापासून योग्य लाभ घेतात) त्यांची सर्व कार्ये पूर्ण होतात. ॥63॥
Subject
पुन्हा तोच विषय -