Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 54

66 Mantra
16/54
Devata- रुद्रा देवताः Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्वा देवा ऋषयः Chhand- विराडर्ष्यनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
असं॑ख्याता स॒हस्रा॑णि॒ ये रु॒द्राऽअधि॒ भूम्या॑म्। तेषा॑ सहस्रयोज॒नेऽव॒ धन्वा॑नि तन्मसि॥५४॥

असं॑ख्या॒तेत्यस॑म्ऽख्याता। स॒हस्रा॑णि। ये। रु॒द्राः। अधि॑। भूम्या॑म्। तेषा॑म्। स॒ह॒स्र॒यो॒ज॒न इति॑ सहस्रऽयोज॒ने। अव॑। धन्वा॑नि। त॒न्म॒सि॒ ॥५४ ॥

Mantra without Swara
असङ्ख्याता सहस्राणि ये रुद्रा अधि भूम्याम् । तेषाँ सहस्रयोजने व धन्वानि तन्मसि ॥

असंख्यातेत्यसम्ऽख्याता। सहस्राणि। ये। रुद्राः। अधि। भूम्याम्। तेषाम्। सहस्रयोजन इति सहस्रऽयोजने। अव। धन्वानि। तन्मसि॥५४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (सैनिक प्रजाजनांना म्हणत आहेत) लोकहो, ज्याप्रमाणे आम्ही (सैनिक) (ये) ज्या (असंख्याता) अगणित (सहग्राणि) हजारो (रुद्रा:) जीवांसाठी (त्यांच्या रक्षणासाठी) अथवा प्राण (उत्साह, वीरत्व आदी भाव) जागृत करण्यासाठी या (भूम्याम्) पृथ्वी (आधि) वर आहोत, आणि (तेषाम्) त्या जीवांसाठी (सहस्रयोजने) असंख्य चार कोस योजना (आठ मैल) एवढी लांबी-रुंदी असणार्‍या (छोट्या छोट्या राज्यामध्ये) आम्ही सैनिक (धन्वनि) धनुष्य (आमचे अस्त्र-शस्त्रादींचा विस्तार करतो, (त्या राज्यांचे रक्षण करतो) तद्वत तुम्ही प्रजाजनांनी देखील करावे ॥54॥
Essence
भावार्थ - मनुष्यांना उचित आहे की या पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारचे शरीर धारण करणारे जे विविध असंख्य प्राणी आहेत, त्यांना वायूंना जाणावे (त्यांचे गुण व प्रभाव जाणून त्यांपासून लाभ घ्यावेत) आणि त्या पदार्थांविषयी आपले कर्तव्य काय आहेत, हे ही समजून घ्यावे. ॥54॥
Subject
मनुष्यांनी (निसर्गाकडून) कशाप्रकारे लाभ घ्यावेत, पुढील मंत्रात याविषयी :