Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 53

66 Mantra
16/53
Devata- रुद्रा देवताः Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्वा देवा ऋषयः Chhand- निचृदार्ष्यनुस्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
स॒हस्रा॑णि सहस्र॒शो बा॒ह्वोस्तव॑ हे॒तयः॑। तासा॒मीशा॑नो भगवः परा॒चीना॒ मुखा॑ कृधि॥५३॥

स॒हस्रा॑णि। स॒ह॒स्र॒श इति॑ सहस्र॒ऽशः। बा॒ह्वोः। तव॑। हे॒तयः॑। तासा॑म्। ईशा॑नः। भ॒ग॒व॒ इति॑ भगवः। प॒रा॒चीना॑। मुखा॑। कृ॒धि॒ ॥५३ ॥

Mantra without Swara
सहस्राणि सहस्रशो बाह्वोस्तव हेतयः । तासामीशानो भगवः पराचीना मुखा कृधि ॥

सहस्राणि। सहस्रश इति सहस्रऽशः। बाह्वोः। तव। हेतयः। तासाम्। ईशानः। भगव इति भगवः। पराचीना। मुखा। कृधि॥५३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (भगत:) भाग्यशाली सेनापती, (तव) आपल्या (बाह्वो:) बाहूंमध्ये जी (सहस्राणि) असंख्य (हेतय:) व्रज आदी शस्त्रें आहेत (आपल्याजवळ दूरवर प्रहार करणारी जी अस्त्र-शस्त्रें आहेत) (तासाम्) त्यांचे (ईशान:) आपण अधिपती, स्वामी वा चालविणारे आहात (सहस्रश:) सहस्र शत्रू जरी आले, तरी ही आपण त्यांचे (मुख) मुख (आपल्यावर होणारे आक्रमण) (पराचीना) पुन्हा परतीच्या दिशेला (म्हणजे परतवून) लावू शकता आपण तेच (कृधि) करा ॥53॥
Essence
भावार्थ - राजपुरुषांना (सेनापती, अधिकारी, सैनिक आदींना) योग्य आहे की आपल्या बाहुबळाने राज्य मिळवावे आणि वाढवावे, तसेच असंख्य शुरवीर सैनिक ठेऊन आपल्यावर चाल करून येणार्‍या शत्रूंचे मुख वळवावे (आक्रमण परतवून लावावे) ॥53॥
Subject
राजपुरुषांनी काय केले पाहिजे, या विषयी