Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 52

66 Mantra
16/52
Devata- रुद्रा देवताः Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्वा देवा ऋषयः Chhand- आर्ष्युनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
विकि॑रिद्र॒ विलो॑हित॒ नम॑स्तेऽअस्तु भगवः। यास्ते॑ स॒हस्र॑ꣳ हे॒तयो॒ऽन्य॑म॒स्मन्नि व॑पन्तु॒ ताः॥५२॥

विकि॑रि॒द्रेति॒ विऽकि॑रिद्र। विलो॑हि॒तेति॒ विऽलो॑हित। नमः॑। ते॒। अ॒स्तु॒। भ॒ग॒व॒ इति॑ भगऽवः। याः। ते॒। स॒हस्र॑म्। हे॒तयः॑। अन्य॑म्। अ॒स्मत्। नि। व॒प॒न्तु॒। ताः ॥५२ ॥

Mantra without Swara
विकिरिद्र विलोहित नमस्तेऽअस्तु भगवः । यास्ते सहस्रँ हेतयोन्यमस्मन्निवपन्तु ताः ॥

विकिरिद्रेति विऽकिरिद्र। विलोहितेति विऽलोहित। नमः। ते। अस्तु। भगव इति भगऽवः। याः। ते। सहस्रम्। हेतयः। अन्यम्। अस्मत्। नि। वपन्तु। ताः॥५२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (विक्रिरिद्र्) शूकराप्रमाणे झोपून राहणार्‍या, (घाणीत लोळणार्‍या) अथवा शूकरासारख्या घृणीत वागणार्‍या मनुष्यांना वश करणारे आणि (विलोहित) विविध पदार्थांनी संपन्न असणारे हे (भमर:) ऐश्वर्यशाली सभापती राजा (आळशी, निरूद्योगी व किळसवाणे आयुष्य जगणाऱ्या लोकांना प्रेरणा देऊन उत्साही करणार्‍या हे राजा) (ते) आपणास (नम:) (आम्हा प्रजाजनांच्या ) (नम्र:) सत्कार-भावना (अस्तु) प्राप्त होवोत (आम्ही आपणाला वंदनीय मानतो) तसेच आपणांस प्रार्थना की (ते) आपले (या:) जे (सहस्रम्) असंख्य (हेतम:) वज्रादी अस्त्रे आहेत अथवा विविध क्षेत्रात आपण केलेली प्रगती आहे (ता:) ती अस्त्र-शस्त्रें (अस्मत्) (आमच्या रक्षणासाठी) आमच्यापेक्षा वेगळा अर्थात जो आमचा शत्रू आहे, त्याचे (निवयन्तु) छेदन वा विनाश करावेत ॥52॥
Essence
भावार्थ - प्रजाजनांनी राजपुरुषांना असे सांगावे की आपणाकडे जी अस्त्र-शस्त्रें आहेत तसेच आपण जी प्रगती, उन्नती साधलेली आहे, ती शस्त्रें आहेत तसेच आपण जी प्रगती, उन्नती साधलेली आहे, ती शस्त्रें व प्रगती आम्हाला सुख देणारी ठरो आणि आमच्या शत्रूंचा विनाश करणारी होवो ॥52॥
Subject
प्रजाजनांनी राजपुरुषांनी कसे वागावे, याविषयी-