Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 50

66 Mantra
16/50
Devata- रुद्रा देवताः Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्वा देवा ऋषयः Chhand- आर्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
परि॑ नो रु॒द्रस्य॑ हे॒तिर्वृ॑णक्तु॒ परि॑ त्वे॒षस्य॑ दुर्म॒तिर॑घा॒योः। अव॑ स्थि॒रा म॒घव॑द्भ्यस्तनुष्व॒ मीढ्व॑स्तो॒काय॒ तन॑याय मृड॥५०॥

परि॑। नः॒। रु॒द्रस्य॑। हे॒तिः। वृ॒ण॒क्तु॒। परि॑। त्वे॒षस्य॑। दु॒र्म॒तिरिति॑ दुःऽम॒तिः। अ॒घा॒योः। अ॒घा॒योरित्य॑घ॒ऽयोः। अव॑। स्थि॒रा। म॒घव॑द्भ्य॒ इति॑ म॒घव॑त्ऽभ्यः। त॒नु॒ष्व॒। मीढ्वः॑। तो॒काय॑। तन॑याय। मृ॒ड॒ ॥५० ॥

Mantra without Swara
परि नो रुद्रस्य हेतिर्वृणक्तु परि त्वेषस्य दुर्मतिरघायोः । अव स्थिरा मघवद्भ्यस्तनुष्व मीढ्वस्तोकाय तनयाय मृड ॥

परि। नः। रुद्रस्य। हेतिः। वृणक्तु। परि। त्वेषस्य। दुर्मतिरिति दुःऽमतिः। अघायोः। अघायोरित्यघऽयोः। अव। स्थिरा। मघवद्भ्य इति मघवत्ऽभ्यः। तनुष्व। मीढ्वः। तोकाय। तनयाय। मृड॥५०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (मीढ्व:) सुखाची वृष्टी करणारे राजपुरुषहो, (रुद्रस्य) सभापती राजाचे ते जे (हेति:) व्रज (नामक अतिसंहारक अस्त्र) आहे, त्याद्वारे तुम्ही (त्वेषस्य) क्रोधाने स्वत:च जळत असलेल्या (अद्यायो:) आणि स्वत:च स्वत:च्या आत्म्याशी दुर्वर्तन, दुर्विचार करणार्‍या दुर्जनापासून (न:) आम्हा प्रजाजनांना (परिवृणक्तु) सर्वथा दूर ठेवा (व्रज आदी अस्त्रांने दुष्टांचा संहार करून आमचे रक्षण करा) त्याचप्रमाणे ( हे वैद्यराज), (मद्यवद्भ्य:) धनवंताकडून मिळालेली जी (स्थिरा) प्रभूत वा पुष्कळ धनसंपत्ती आहे, ती तुम्ही (तोकाय) सघ: जात शिशूसाठी तसेच (तनयाय) कुमार, किशोर वयाच्या मुलांसाठी (परितनुष्व) योग्यप्रकारे वापरा आणि (अवमृड) सर्वांना सुखी व नीरोग करा ॥50॥
Essence
भावार्थ - राजपुरुषांनी अशी धर्ममय कामें व प्रयत्न करावेत की ज्यामुळे प्रजा सुरक्षित होईल आणि दुष्टांचा विनाश होईल. त्याचप्रमाणे उत्तम वैद्यांनी सर्वांच्या आरोग्य आणि स्वातंत्र्यासाठी यत्न करून त्यांना सुखी करावे. अशा व्यवहारामुळे ते स्वत: आणि सर्वजण सुखी-समाधानी राहतील ॥50॥
Subject
राजपुरुषांचे कर्तव्य काय, पुढील मंत्रात याविषयी -