Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 5

66 Mantra
16/5
Devata- एकरूद्रो देवता Rishi- बृहस्पतिर्ऋषिः Chhand- भुरिगार्षी बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
अध्य॑वोचदधिव॒क्ता प्र॑थ॒मो दैव्यो॑ भि॒षक्। अही॑ श्चँ॒ सर्वा॑ञ्ज॒म्भय॒न्त्सर्वा॑श्च यातुधा॒न्योऽध॒राचीः॒ परा॑ सुव॥५॥

अधि॑। अ॒वो॒च॒त्। अ॒धि॒व॒क्तेत्य॑धिऽव॒क्ता। प्र॒थ॒मः। दैव्यः॑। भि॒षक्। अही॑न्। च॒। सर्वा॑न्। ज॒म्भय॑न्। सर्वाः॑। च॒। या॒तु॒धा॒न्य᳖ इति॑ यातुऽधा॒न्यः᳖। अ॒ध॒राचीः॑। परा॑। सु॒व॒ ॥५ ॥

Mantra without Swara
अध्यवोचदधिवक्ता प्रथमो दैव्यो भिषक् । अहीँश्च सर्वाञ्जम्भयन्त्सर्वाश्च यातुधान्यो धराचीः परा सुव ॥

अधि। अवोचत्। अधिवक्तेत्यधिऽवक्ता। प्रथमः। दैव्यः। भिषक्। अहीन्। च। सर्वान्। जम्भयन्। सर्वाः। च। यातुधान्य इति यातुऽधान्यः। अधराचीः। परा। सुव॥५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे रुद्र अर्थात रोगनाशक वैद्यराज आपण (प्रथम:) प्रमुख आणि (दैव्य:) विद्वत्समाजात ख्यातिप्राप्त आहात. (अधिक्ता) आपण सर्व उद्य कक्षातील विद्यार्थ्यांना वैद्यकशास्त्र शिकविण्यात निष्णात आणि (भिषक्) योग्य रोग-निदान करून रोग निवारण करणारे आहात.^(अहीन्) सापाप्रमाणे प्राणहरण करणार्‍या (सर्वान्) सर्व रोगांना (जम्भयन्) औषधी प्रयोगाने (च) निश्चयाने वा अवश्यमेव (अध्यवोचत्) दूर करण्याविषयी आपण आम्हाला उपदेश करा (औषधींची माहिती सांगा) त्याचबरोबर (अधराची:) नीचतेकडे नेणार्‍या (सर्वा:) सर्व ज्या (धातुधान्य:) रोगकारिणी औषधी अथवा व्यभिचारिणी स्त्रिया आहेत, त्यांना परा, सुव) दूर करा (आम्हाला अशा दुर्व्यसनापासून दूर राहण्याचा मार्ग सांगा) ॥5॥
Essence
भावार्थ - राजा आदी सभासदजनांना पाहिजे की त्यांनी सर्वांहून कुशल, मुख्य आणि धर्मात्मा व्यक्तीला वैद्य म्हणून नेमावे की ज्याने सर्व रोगाविषयी तसेच औषधींच्या गुण-प्रमादादीविषयी ज्ञान मिळविले आहे. अशा प्रतिष्ठित वैद्यांची राज्यामधे (प्रजेचे आरोग्य सांभाळण्यासाठी) आणि सैन्यात सैनिकांच्या (औषधोपचारासाठी नेमणूक करावी) याशिवाय सुखनाशक रोगापासून आणि व्यभिचारिणी स्त्रियांपासून प्रजेतील स्त्री-पुरुषांना दूर ठेवावे. ॥5॥
Subject
पुढील मंत्रात देखील तोच विषय (वैद्यराज) सांगितला आहे -