Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 43

66 Mantra
16/43
Devata- रुद्रा देवताः Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्वा देवा ऋषयः Chhand- जगती Swara- निषादः
Mantra with Swara
नमः॑ सिक॒त्याय च प्रवा॒ह्याय च॒ नमः॑ किꣳशि॒लाय॑ च क्षय॒णाय॑ च॒ नमः॑ कप॒र्दिने॑ च पुल॒स्तये॑ च॒ नम॑ऽइरि॒ण्याय च प्र॒पथ्याय च॥४३॥

नमः॑। सि॒क॒त्या᳖य। च॒। प्र॒वा॒ह्या᳖येति॑ प्रऽवा॒ह्या᳖य। च॒। नमः॑। कि॒ꣳशि॒लाय॑। च॒। क्ष॒य॒णाय॑। च॒। नमः॑। क॒प॒र्दिने॑। च॒। पु॒ल॒स्तये॑। च॒। नमः॑। इ॒रि॒ण्या᳖य। च॒। प्र॒प॒थ्या᳖येति॑ प्रऽप॒थ्या᳖य। च॒ ॥४३ ॥

Mantra without Swara
नमः सिकत्याय च प्रवाह्याय च नमः किँशिलाय च क्षयणाय च नमः कपर्दिने च पुलस्तये च नम इरिण्याय च प्रपथ्याय च नमः सिकत्याय ॥

नमः। सिकत्याय। च। प्रवाह्यायेति प्रऽवाह्याय। च। नमः। किꣳशिलाय। च। क्षयणाय। च। नमः। कपर्दिने। च। पुलस्तये। च। नमः। इरिण्याय। च। प्रपथ्यायेति प्रऽपथ्याय। च॥४३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - जे ( सिकत्याय) वाळूपासून उपयोगी पदार्थ (सोने, अभ्रक आदी) पदार्थ काढण्यात कुशल असतात, (च) आणि जे (प्रवाह्याय) बैल आदी पशूंपासून काम घेण्यात पटाईत असतात, अशा कर्मकुशल मनुष्यांना (नम:) जे अन्न आदी देतात (ते सर्व प्रिय होतात) तसेच जे लोक (किंशिलाय) दगडापासून उपयोगी वस्तू तयार करतात, त्यांना (च) आणि (क्षयणाय) घर आदी वास्तूंचे निर्माण करणार्‍या (गवंडी, मजूर आदी) लोकांना (नम:) अन्न देतात, (कर्यादने) जटाधारी (च) आणि (पुलस्तये) मोठ-मोठ्या वस्तू उचलणार्‍या या नेऊन ठेवणार्‍या (भारवाहक, शक्तीमान लोकांना) (च) देखील (नम:) अन्न-भोजनादी देतात, तसेच (इरिण्याय) नापीक जमिनीपासून देखील उपयोगी पदार्थ पिकविणार्‍या वा काढणार्‍या लोकांचा (च) आणि (प्रपथ्याय) लोकांना उत्तम धर्ममार्गावर नेणार्‍या लोकांचा (च) देखील जे (दानशील) लोक (नम:) सत्कार करतात, ते लोक सर्व प्रिय होतात ॥43॥
Essence
भावार्थ - मनुष्यांना हवे की त्यानी भूगर्भ विद्येचे ज्ञान संपादित करून वाळू, माती आदी पदार्थांपासून सुवर्ण आदी धातू काढावेत आणि अशाप्रकारे आपले ऐश्वर्य व धन वाढवून त्या धनाने अनाथांचे पालन-पोषण करावे ॥43॥
Subject
मनुष्यांनी काय करावे (त्यांचे कर्तव्य काय) याविषयी -