Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 42

66 Mantra
16/42
Devata- रुद्रा देवताः Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्वा देवा ऋषयः Chhand- निचृदार्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
नमः॒ पार्या॑य चावा॒र्याय च॒ नमः॑ प्र॒तर॑णाय चो॒त्तर॑णाय च॒ नम॒स्तीर्थ्या॑य च॒ कूल्या॑य च॒ नमः॒ शष्प्या॑य च॒ फेन्या॑य च॥४२॥

नमः॑। पार्या॑य। च॒। अ॒वा॒र्या᳖य। च॒। नमः॑। प्र॒तर॑णा॒येति॑ प्र॒ऽतर॑णाय। च॒। उ॒त्तर॑णा॒येत्यु॒त्ऽतर॑णाय। च॒। नमः॑। तीर्थ्या॑य। च॒। कूल्या॑य। च॒। नमः॑। शष्प्या॑य। च॒। फेन्या॑य। च॒ ॥४२ ॥

Mantra without Swara
नमः पार्याय चावार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमस्तीर्थ्याय च कूल्याय च नमः शष्प्याय च फेन्याय च नमः सिकत्याय ॥

नमः। पार्याय। च। अवार्याय। च। नमः। प्रतरणायेति प्रऽतरणाय। च। उत्तरणायेत्युत्ऽतरणाय। च। नमः। तीर्थ्याय। च। कूल्याय। च। नमः। शष्प्याय। च। फेन्याय। च॥४२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - जे लोक (पार्याय) दु:ख (सागराच्या पार वा पलीकडे गेले आहेत (निर्द्वन्द्व व समाधानी आहेत) (च) तसेच जे (अवर्याय) दु:खसागराच्या या तीरावर आहेत (दु:ख दूर करण्याचे उपाय शोधत आहेत) त्यांना (नम:) जे नमन व संस्कृत करतात (त्यांचे कल्याण होते) तसेच (प्रतरणाय) नौका आदी साधनांनी त्या किनार्‍यावरून लोकांना या तीरावर आणणार्‍या लोकांचा (कोळी वा नाविकांचा) (च) आणि (उत्तरणाय) या किनार्‍यावरून त्या तीरावर नेणार्‍या लोकांचा (नाविकांचा) (नम:) जे सत्कार करतात, (त्यांचे सदैव कल्याण होते) याशिवाय (तीर्थ्याय) वेदविद्या शिकविणार्‍या अध्यापकांचा अथवा सत्यभाषण आदी पवित्र कार्यांमधे व्यस्त असणार्‍या गुणिजनांचा जे सत्कार करतात, (च) आणि (कूल्याय) समुद्राच्या वा नदीतीरावर राहणार्‍या लोकांना (च) देखील (नम:) जे अन्न आदी देतात, तसेच (शष्याय) तृण, (गवत, लाकूड आदी पदार्थांचा संचय करण्यात प्रवीण असलेल्या (लाकूडतोड्या, गवळी आदी) लोकांना (च) आणि (फेन्याय) पाण्यावरील फेस, (तरंग) बुडबुडे आदीपासून (ऊर्जा वा शक्ती संपादित करणार्‍या) कुशल लोकांना (च) देखील जे (नम:) अन्न आदी देतात, त्या लोकांचे सदैव हित होत असते ॥42॥
Essence
भावार्थ - बुद्धिमान मनुष्यांनी कुशल प्रशिक्षित नाविक आदी लोकांना आपल्या सेनेत ठेऊन त्यांना समुद्र, नदी आदींच्या या तीरावर वा या तीरावरून त्या तीरावर (दूर-दूरच्या सागरी प्रदेशावर) पाठवावे. त्यांना देश-देशांतरी. आणि द्वीप-द्वीपांतरी पाठवून विविध उद्योग-व्यापार करीत आपल्या धन-संपत्तीत वृद्धी केली पाहिजे ॥42॥
Subject
पुढील मंत्रातही तोच विषय (कल्याण कसे होईल) प्रतिपादित आहे -