Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 41

66 Mantra
16/41
Devata- रुद्रा देवताः Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्वा देवा ऋषयः Chhand- स्वराडार्षी बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
नमः॑ शम्भ॒वाय॑ च मयोभ॒वाय॑ च॒ नमः॑ शङ्क॒राय॑ च मयस्क॒राय॑ च॒ नमः॑ शि॒वाय॑ च शि॒वत॑राय च॥४१॥

नमः॑। श॒म्भ॒वायेति॑ शम्ऽभ॒वाय॑। च॒। म॒यो॒भ॒वायेति॑ मयःऽभ॒वाय॑। च॒। नमः॑। श॒ङ्क॒रायेति॑ शम्ऽक॒राय॑। च॒। म॒य॒स्क॒राय॑। म॒यः॒क॒रायेति॑ मयःऽक॒राय॑। च॒। नमः॑। शि॒वाय॑। च॒। शि॒वत॑रा॒येति॑ शि॒वऽत॑राय। च॒ ॥४१ ॥

Mantra without Swara
नमः शम्भवाय च मयोभवाय च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च ॥

नमः। शम्भवायेति शम्ऽभवाय। च। मयोभवायेति मयःऽभवाय। च। नमः। शङ्करायेति शम्ऽकराय। च। मयस्कराय। मयःकरायेति मयःऽकराय। च। नमः। शिवाय। च। शिवतरायेति शिवऽतराय। च॥४१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - जे लोक (शम्भवाय) सुख देणार्‍या परमेश्वराचा (च) आणि (मयोभवाय) सुख-प्राप्तीचे कारण वा स्रोत असणार्‍या विद्वान पुरुषाचा (च) देखील (नम:) सत्कार करतात, (परमेश्वराची उपासना करतात) तसेच (शड्कराय) कल्याण करणार्‍या (च) आणि (मयस्कराय) सर्व जीवांना सुख देणार्‍या (च) परमेश्वराचा अथवा सज्जनांचा (च) देखील जे लोक (नम:) सत्कार करतात (परमेश्वराची स्तुती करतात) याशिवाय जे लोक (शिवाय) मंगलकारी परमेश्वराची (उपासना वा प्रार्थना) (च) आणि (शिवतराय) सर्वांचे अत्यंत मंगल करणार्‍या सत्पुरुषाचा (च) देखील (नम:) सत्कार व आदर -सन्मान करतात, त्या माणसांचेच कल्याण होत असते. ॥41॥
Essence
भावार्थ : सर्व लोकांनी सर्व मंगलदाता परमेश्वराची अत्यंत प्रेमाने व भक्तिभावनेने उपासना केली पाहिजे, तसेच आदर-मानपूर्वक सेनाध्यक्षाचा (विद्वान व सत्पुरुषजनांचा) सत्कार अवश्य केला पाहिजे, कारण त्या मार्गानेच माणसें स्वत:चे अभीष्ट कार्य पूर्ण करू शकतात. ॥41॥
Subject
मनुष्यांनी आपले इष्ट कशाप्रकारे पूर्ण करावे, याविषयी -