Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 40

66 Mantra
16/40
Devata- रुद्रा देवताः Rishi- परमेष्ठी प्रजापतिर्वा देवा ऋषयः Chhand- अतिशक्वरी Swara- पञ्चमः
Mantra with Swara
नमः॑ श॒ङ्गवे॑ च पशु॒पत॑ये च॒ नम॑ उ॒ग्राय॑ च भी॒माय॑ च॒ नमो॑ऽग्रेव॒धाय॑ च दूरेव॒धाय॑ च॒ नमो॑ ह॒न्त्रे च॒ हनी॑यसे च॒ नमो॑ वृ॒क्षेभ्यो॒ हरि॑केशेभ्यो॒ नम॑स्ता॒राय॑॥४०॥

नमः॑। श॒ङ्गव॒ इति॑ श॒म्ऽगवे॑। च॒। प॒शु॒पत॑य इति॑ प॒शु॒ऽपत॑ये। च॒। नमः॑। उ॒ग्राय॑। च॒। भी॒माय॑। च॒। नमः॑। अ॒ग्रे॒व॒धायेत्य॑ग्रेऽव॒धाय॑। च॒। दू॒रे॒व॒धायेति॑ दूरेऽव॒धाय॑। च॒। नमः॑। ह॒न्त्रे। च॒। हनी॑यसे। च॒। नमः॑। वृ॒क्षेभ्यः॑। हरि॑केशेभ्य इति॒ हरि॑ऽकेशेभ्यः। नमः॑। ता॒राय॑ ॥४० ॥

Mantra without Swara
नमः शङ्गवे च पशुपतये च नम उग्राय च भीमाय च नमोग्रेवधाय च दूरेवधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमस्ताराय ॥

नमः। शङ्गव इति शम्ऽगवे। च। पशुपतय इति पशुऽपतये। च। नमः। उग्राय। च। भीमाय। च। नमः। अग्रेवधायेत्यग्रेऽवधाय। च। दूरेवधायेति दूरेऽवधाय। च। नमः। हन्त्रे। च। हनीयसे। च। नमः। वृक्षेभ्यः। हरिकेशेभ्य इति हरिऽकेशेभ्यः। नमः। ताराय॥४०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - जी माणसें (शड्गवे) सुख-प्राप्तीसाठी झटणार्‍या (च) आणि (पशुपतये) गौ आदी पशूंचे दालन करणार्‍या लोकांना (च) तसेच गौ आदी पशूंनादेखील (नम:) अन्न आदी पदार्थ देतात, (ते सुखी-समाधानी होतात). तसेच (उग्राय) तेजस्वीजनांचा (च) आणि (भीमाय) सर्वांना भयभीत करणार्‍या (ज्यांचा सर्वांवर प्रभाव व दबदबा आहे, त्या माणसांचा) जे लोक सत्कार-सन्मान करतात (ते सुखी होतात) तसेच (अग्रेवधाय) पुढे होऊन शत्रूंना कैद करणार्‍या (धाडशी वीरांना) (च) आणि (दूरेवधाय) दूर प्रदेशात असणार्‍या शत्रूलादेखील कैद करणार्‍या वा मारणार्‍या परमवीर सैनिकांना (च) देखील (नम:) अन्न आदी देतात (धान्यादीचा पुरवठा करतात), (ते सुखी होतात) तसेच (हन्त्रे) दुष्टांचा वध करणार्‍या (च) आणि (ऽहनीयसे) दुर्जनांचा पूर्णत: विनाश करणार्‍या (च) लोकांनाही (नम:) अन्न-धान्य देतात, (वृक्षेभ्य:) शत्रूंना मारणार्‍यांना अथवा वृक्षांना (जल देऊन वाढविणार्‍या) आणि (हरिकेशेभ्य:) कृहरित (कृष्ण) केश असणार्‍या वृक्षांना (नम:) (जल देऊन पालित-पोषित करतात) व सैनिकांचा सत्कार करतात, तसेच (ताराय) जे लोक (समाजसेवा करून) लोकांचे दु:ख वा अडचणी दूर करतात, त्यांना जे अन्न-आदी देतात, ते लोकच सुखी-समाधानी होतात. ॥40॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनी गौ आदी पशूंचे पालन करावे आणि हिंस्रभयकारी पशूंचा वध करून स्वत: संतुष्ट रहावे व इतरांनाही सुखी-समाधानी ठेवावे ॥40॥
Subject
मनुष्यांनी सुखी समाधानी कसे होता येईल पुढील मंत्रात याविषयी -