Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 39

66 Mantra
16/39
Devata- रुद्रा देवताः Rishi- कुत्स ऋषिः Chhand- स्वराडार्षी पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
नमो॒ वात्या॑य च॒ रेष्म्या॑य च॒ नमो॑ वास्त॒व्याय च वास्तु॒पाय॑ च॒ नमः॒ सोमा॑य च रु॒द्राय॑ च॒ नम॑स्ता॒म्राय॑ चारु॒णाय॑ च॥३९॥

नमः॑। वात्या॑य। च॒। रेष्म्या॑य। च॒। नमः॑। वा॒स्त॒व्या᳖य। च॒। वा॒स्तु॒पायेति॑ वास्तु॒ऽपाय॑। च॒। नमः॑। सोमा॑य। च॒। रु॒द्राय॑। च॒। नमः॑। ता॒म्राय॑। च॒। अ॒रु॒णाय॑। च॒ ॥३९ ॥

Mantra without Swara
नमो वात्याय च रेष्म्याय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च नमः सोमाय च रुद्राय च नमस्ताम्राय चारुणाय च नमः शङ्गवे ॥

नमः। वात्याय। च। रेष्म्याय। च। नमः। वास्तव्याय। च। वास्तुपायेति वास्तुऽपाय। च। नमः। सोमाय। च। रुद्राय। च। नमः। ताम्राय। च। अरुणाय। च॥३९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - जे लोक (रात्याय) वायुविद्येत प्रवीण असलेल्या (च) आणि (रेष्म्याय) (अन्यायी दुष्टजनांचा मारक म्हणून प्रसिद्ध असलेल्या शासनकर्त्याला (च) देखील (नम:) अन्न-धान्य आदी देतात, (च) तसेच (वास्तव्याय) निवासीय गृहादीमधे राहणार्‍या (च) आणि (वास्तुपाय) निवासगृहांचे रक्षण करणार्‍या (शिपाई, चौकीदार आदी) लोकांचा सन्मान करतात, त्याचप्रमाणे जे लोक (सोमाय) धनाढ्य लोकांचा (च) आणि (रुद्राय) दुष्टांना रडविणार्‍या लोकांचा (नम:) सत्कार करतात वा (रुद्राय) दुष्टांना रडविणार्‍या लोकांचा (नम:) सत्कार करतात वा त्यांना आवश्यक पदार्थ पुरवितात (च) शिवाय (ताम्राय) वाईट कृत्यापासून दूर करणार्‍या (च) आणि (अरूणाय) उत्तम पदार्थांच्या प्राप्तीकरिता झटणार्‍या लोकांचा (नम:) सत्कार सन्मान करतात, ते धन-संपत्ती प्राप्त करतात, (हे नि:संशय) ॥39॥
Essence
भावार्थ - जेव्हा मनुष्य (विद्या-कला आदीद्वारे) वायु (जल, अग्नी आदीच्या) गुण व उपयोग ओळखून त्या शक्तीचा अनेक उपयुक्त कार्यात उपयोग करतात, तेव्हा ते अनेक सुख-सोयी प्राप्त करतात (वा करू शकतात) ॥39)
Subject
माणसांनी जगातील (जलाशिवाय) इतर पदार्थांपासून कोणते व कसे लाभ घ्यावेत, पुढील मंति याविषयी -