Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 37

66 Mantra
16/37
Devata- रुद्रा देवताः Rishi- कुत्स ऋषिः Chhand- निचृदार्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
नमः॒ स्रुत्या॑य च॒ पथ्या॑य च॒ नमः॒ काट्या॑य च॒ नीप्या॑य च॒ नमः॒ कुल्या॑य च सर॒स्याय च॒ नमो॑ नादे॒या॑य च वैश॒न्ताय॑ च॥३७॥

नमः॑। स्रुत्या॑य। च॒। पथ्या॑य। च॒। नमः॑। काट्या॑य। च॒। नीप्या॑य। च॒। नमः॑। कुल्या॑य। च॒। स॒र॒स्या᳖य। च॒। नमः॑। ना॒दे॒याय॑। च॒। वै॒श॒न्ताय॑। च॒ ॥३७ ॥

Mantra without Swara
नमः स्रुत्याय च पथ्याय च नमः काट्याय च नीप्याय च नमः कुल्याय च सरस्याय च नमो नादेयाय च वैशन्ताय च नमः कूप्याय ॥

नमः। स्रुत्याय। च। पथ्याय। च। नमः। काट्याय। च। नीप्याय। च। नमः। कुल्याय। च। सरस्याय। च। नमः। नादेयाय। च। वैशन्ताय। च॥३७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - मनुष्यांचे कर्तव्य आहे की (स्रुत्याय) लहान स्रोताजवळ (झरे, ओढे आदीच्या आश्रयाने वसलेल्या गावांच्या रहिवासी लोकांसाठी (च) आणि (पथ्याय) वाटेवर चालत राहणार्‍या (भटक्या जाती जमातीसाठी) (च) तसेच नवीन मार्ग शोधणार्‍या वा निर्माण करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी (नम:) भोजनाची व्यवस्था करावी. तसेच (काट्याय) विहीर, आड आदींजवळ राहणार्‍या (च)(नीप्याय) मोठ्या सरोवराच्या काठी वसलेल्या लोकांना (च) आणि त्यांच्या अधितजनांना (नम:) अन्नादी द्यावे व त्यांचा सत्कार करावा. त्याचप्रमाणे (क्रुल्याय) कालवे निर्माण करणार्‍या कामगारांसाठी (च) आणि (सरस्याय) तलाव, धरण आदी तयार च्या कमी गुंतलेल्या कर्मचार्‍यांसाठी (च) आणि (नादेयाय) नदीतटावर राहणार्‍या (च) आणि (वेशन्ताय) लहान-लहान तलाव, बंधारे आदीत राहणार्‍या प्राण्यांसाठी (च) तसेच विहीर, कुंड आदीत राहणार्‍या जीवांसाठी (नम:) इतर सर्व लोकांनी अन्न आदी जीवनावश्यक पदार्थ पुरवावेत वा द्यावेत व अशाप्रकारे त्यांच्याविषयी सहानुभूती दाखवावी. ॥37॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनी हे केले पाहिजे की त्यानी नदी, कुंड, विहीरी, जलीय-प्रदेश यासर्व ठिकाणी उपलब्ध पाणी लहान-मोठ्या तलावात (साठवून) (तसेच कालव्याद्वारे दूर दूरपर्यंत नेऊन बंधारे, धरण, शेते यामध्ये न्यावे आणि त्याद्वारे भरपूर धान्य, फळे, वृक्ष, वेली झाडी-झुडपे वाढवावीत. ॥37॥
Subject
मनुष्यांनी पाण्यापासून कशा प्रकारे (व कोणते) फललाभ घ्यावेत, पुढील मंत्रात हा विषय-