Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 36

66 Mantra
16/36
Devata- रुद्रा देवताः Rishi- कुत्स ऋषिः Chhand- स्वराडार्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
नमो॑ धृ॒ष्णवे॑ च प्रमृ॒शाय॑ च॒ नमो॑ निष॒ङ्गिणे॑ चेषुधि॒मते॑ च॒ नम॑स्ती॒क्ष्णेष॑वे चायु॒धिने॑ च॒ नमः॑ स्वायु॒धाय॑ च सु॒धन्व॑ने च॥३६॥

नमः॑। धृ॒ष्णवे॑। च॒। प्र॒मृ॒शायेति॑ प्रऽमृ॒शाय॑। च॒। नमः॑। नि॒ष॒ङ्गिणे॑। च॒। इ॒षु॒धि॒मत॒ इती॑षुधि॒ऽमते॑। च॒। नमः॑। ती॒क्ष्णेष॑व॒ इति॑ ती॒क्ष्णऽइ॑षवे। च॒। आ॒यु॒धिने॑। च॒। नमः॑। स्वा॒यु॒धायेति॑ सुऽआ॒यु॒धाय॑। च॒। सु॒धन्व॑न॒ इति॑ सुऽधन्व॑ने। च॒ ॥३६ ॥

Mantra without Swara
नमो धृष्णवे च प्रमृशाय च नमो निषङ्गिणे चेषुधिमते च नमस्तीक्ष्णेषवे चायुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च ॥

नमः। धृष्णवे। च। प्रमृशायेति प्रऽमृशाय। च। नमः। निषङ्गिणे। च। इषुधिमत इतीषुधिऽमते। च। नमः। तीक्ष्णेषव इति तीक्ष्णऽइषवे। च। आयुधिने। च। नमः। स्वायुधायेति सुऽआयुधाय। च। सुधन्वन इति सुऽधन्वने। च॥३६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - राजाने तसेच प्रजाजनांतील मुख्य अधिकारी लोकांनी आपल्या सैन्यातील (धृष्णवे) धैर्यवंत आणि धाडशी सैनिकांना (च) तसेच (प्रमृशाय) शांत व विचारवंत (च) आणि शांत, मधुर स्वभाव असणार्‍या लोकांना (नम:) अन्न आदी द्यावे. (त्यांच्यासाठी भोजन-निवासाची योग्य व्यवस्था करावी) त्याचप्रमाणे राजाने सैन्यातील (निषद्गिणे) (बाणांचा भाता आदी) अनेकशस्त्र धारण करणार्‍या (च) आणि (इषुधिमते) अस्त्र-शस्त्रांचा मोठा साठा असणार्‍या अधिकार्‍यांचा (स्टोर कीपर) (च) देखील (नम:) अवश्य सत्कार-सन्मान करावा. तसेच (तीक्ष्णेषवे) तीक्ष्ण अस्त्र-शस्त्रांनी युक्त (च) आणि (आयुधिने) तोफ, (बंदूक) आदी द्वारा युद्ध करणार्‍या सेनाप्रमुकाचाही (च) ही (नम:) पुरस्कारादीद्वारे सत्कार करावा. (स्वायुधाय) उत्कृष्ट आयुधांनी समृद्ध (च) आणि (सुधम्वने) चांगल्या धनुष्यांनी युक्त अशा धनुर्धारी सैनिकांना (च) व त्यांच्या सहाय्यकांनादेखील (नम:) अन्न-धान्यादी पदार्था द्यावेत की ज्यायोगे ते युद्धात नेहमी विजयी ठरतील. ॥36॥
Essence
भावार्थ - माणसाने जे काही कर्म करावे ते नीट विचारपूर्वक आणि दृढ उत्साहपूर्वक करावे, कारण की शारीरिक व आत्मिक शक्तीशिवाय शस्त्र चालविणे आणि शत्रूंवर विजय मिळविणे ही कामें कदापी सिद्ध होत नाहीत. (म्हणून वर सांगितल्याप्रमाणे विचाराने, उत्साहाने) कार्ये संपन्न करावीत. ॥36॥
Subject
पुनश्च, तोच विषय