Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 34

66 Mantra
16/34
Devata- रुद्रा देवताः Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- स्वराडार्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
नमो॒ वन्या॑य च॒ कक्ष्या॑य च॒ नमः॑ श्र॒वाय॑ च प्रतिश्र॒वाय॑ च॒ नम॑ऽआ॒शुषे॑णाय चा॒शुर॑थाय च॒ नमः॒ शूरा॑य चावभे॒दिने॑ च॥३४॥

नमः॑। वन्या॑य। च॒। कक्ष्या॑य। च॒। नमः॑। श्र॒वाय॑। च॒। प्र॒ति॒श्र॒वायेति॑ प्रतिऽश्र॒वाय॑। च॒। नमः॑। आ॒शुषे॑णाय। आ॒शुसे॑ना॒येत्या॒शुऽसेना॑य। च॒। आ॒शुर॑था॒येत्या॒शुऽर॑थाय। च॒। नमः॑। शूरा॑य। च॒। अ॒व॒भे॒दिन॒ इत्य॑वऽभे॒दिने॑। च॒ ॥३४ ॥

Mantra without Swara
नमो वन्याय च कक्ष्ण्याय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च नमऽआशुषेणाय चाशुरथाय च नमः शूराय चावभेदिने च नमो बिल्मिने ॥

नमः। वन्याय। च। कक्ष्याय। च। नमः। श्रवाय। च। प्रतिश्रवायेति प्रतिऽश्रवाय। च। नमः। आशुषेणाय। आशुसेनायेत्याशुऽसेनाय। च। आशुरथायेत्याशुऽरथाय। च। नमः। शूराय। च। अवभेदिन इत्यवऽभेदिने। च॥३४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (ईश्वर आदेश देत आहे) हे मनुष्यांनो, जे लोक (वन्याय) वनात राहतात (त्या आदिवासी, वन्य जाती-जमातीच्या लोकांना) (च) आणि (कक्ष्याय) जे लोक वनाच्या निकट असलेल्या घरात राहणारे (च) आणि जे वन्य गुहा, (दर्‍या-खोर्‍यात) राहणारे लोक आहेत, त्यांना तुम्ही (नगरनिवासी धनवंत लोकांनी) (नम:) अन्न आदी वस्तू द्याव्यात. तसेच तुम्ही (श्रवाय) (उत्तम वचन) ऐकणार्‍या वा ऐकवणार्‍या लोकांचा (च) आणि (प्रतिश्रवाय) प्रतिज्ञा करणार्‍या दृढनिश्चयी मनुष्याचा (च) आणि प्रतिज्ञा पूर्ण करणार्‍या कर्तृत्ववान व्यक्तींचा (नम:) सत्कार-सन्मान करीत जा. तसेच (आशुशेणाय) शीघ्रमामी आक्रमक सैन्याच्या सेनापतीचा (च) आणि (आशुरथाय) शीघ्रगामी रथांच्या स्वामी महारथींचा (च) तसेच सारथींचा (नम:) अन्नादीद्वारे सत्कार-सन्मान करावा. त्याचप्रमाणे तुम्ही (शूराय) शत्रूंचा वध करणार्‍या (च) आणि (अवभेदिने) शत्रुसैन्याचा विध्वंस करणार्‍या वीर सैनिकांचा (च) आणि आपल्या दूत, हेर आदींचा यथोचित सत्कार अवश्य केला पाहिजे की ज्यायोगे ते सर्वत्र विजय संपादन करतील ॥34॥
Essence
भावार्थ - राजपुरुषांचे कर्तव्य आहे की त्यानी वनात व (गुरुकुल, आश्रम आदीच्या) कक्षात राहणार्‍या अध्येता व अध्यापक जनांचा, बलिष्ठ सैनिकांचा, शीघ्रगामी वाहनात आरूढ होणार्‍या महारथी, सेनापती आदींचा, दूतांचा यथोचित अन्न-धान्य-धन आदी देऊन सत्कार करावा. अशा प्रकारे त्यांना प्रोत्साहित केल्यामुळे ते सदा विजयी ठरतील ॥34॥
Subject
राजपुरुषांनी कसे असावे, पुढील मंत्रात हा विषय प्रतिपादित आहे -