Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 33

66 Mantra
16/33
Devata- रुद्रा देवताः Rishi- कुत्स ऋषिः Chhand- आर्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
नमः॒ सोभ्या॑य च प्रतिस॒र्याय च॒ नमो॒ याम्या॑य च॒ क्षेम्या॑य च॒ नमः॒ श्लोक्या॑य चावसा॒न्याय च॒ नम॑ऽउर्व॒र्याय च॒ खल्या॑य च॥३३॥

नमः॑। सोभ्या॑य। च॒। प्र॒तिस॒र्या᳖येति॑ प्रतिऽस॒र्या᳖य। च॒। नमः॑। याम्या॑य। च॒। क्षेम्या॑य। च॒। नमः॑। श्लोक्या॑य। च॒। अ॒व॒सा॒न्या᳖येत्य॑वऽसा॒न्या᳖य। च॒। नमः॑। उ॒र्व॒र्या᳖य। च॒। खल्या॑य। च॒ ॥३३ ॥

Mantra without Swara
नमः सोम्याय च प्रतिसर्याय च नमो याम्याय च क्षेम्याय च नमः श्लोक्याय चावसान्याय च नमऽउर्वर्याय च खल्याय च नमो वन्याय ॥

नमः। सोभ्याय। च। प्रतिसर्यायेति प्रतिऽसर्याय। च। नमः। याम्याय। च। क्षेम्याय। च। नमः। श्लोक्याय। च। अवसान्यायेत्यवऽसान्याय। च। नमः। उर्वर्याय। च। खल्याय। च॥३३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (ईश्वरीय आदेश वा उपदेश) हे मनुष्यांनो (तुमच्यापैकी) जे (सौभ्याय) ऐश्वर्यवान (च) आणि (प्रतिसर्याय) धर्मात्माजन आहेत (च) आणि जे धनवान धर्मात्मा आहेत, त्यांना तुम्ही (नम:) अन्न-धान्य आदी द्या (अथवा त्यांना आदर-मान द्या) तसेच (याम्याय) श्रेष्ठ न्यायकारी जनांना व (क्षेम्याय) रक्षणकार्यात निष्णात असलेल्या रक्षक जनांना योग्य आदर-मान द्या. (च) तसेच न्यायाधीश आदीसाठी (नम:) अन्न वा मान द्या (त्यांना कोणत्या प्रकारची उणीव भासूं नये, अन्यथा ते भ्रष्टाचारी बनतील) (च) तसेच (श्लोक्याय) वेदवेत्ता विद्वानाचा (च) आणि (अवसान्याय) कार्य पूर्णत्वास नेण्यास निपुण असलेल्या उत्तम कार्यकर्त्यांचा (नम:) योग्यवेळी सत्कार-सन्मान करीत जा. शिवाय (उर्वर्याय) श्रेष्ठजनांचा नेता असलेल्या श्रेष्ठ स्वामीला (च) आणि (खल्याय) चांगले धान्य आदींचा संचय करणार्‍या कार्यकर्त्याला (च) तसेच त्या धन-धान्य आदीचा उत्कृष्ट कार्यात उपयोग करणार्‍या कुशल कर्मचार्‍याला (नम:) सत्कृत करून त्यांना सदैव आनंदित असू द्या. (समाजाकरिता झटणार्‍या दानशील, त्यागी, सदाचारी, धर्मात्मा लोकांनी सर्वांनी सदैव आनंदित व निर्भय ठेवले पाहिजे) ॥33॥
Essence
भावार्थ - या मंत्रात ‘च’ शब्दाचा अनेकवेळा प्रयोग केला आहे, त्यावरून असे जाणावे की ज्यांचा उल्लेख मंत्रात झाला आहे, त्या व्यतिरिक्त इतर श्रेष्ठजनांचाही सत्कार सम्मान केला पाहिजे. प्रजाजनांनी न्यायाधीशांचा न्यायाधीशांनी प्रजाजनांचा आदर-मान करावा. तसेच पतीने पत्नीचा, पत्नीने पतीचा आणि परिवारातील इतर श्रेष्ठ पुरुषांचा मान करून त्याना नेहमी प्रसन्न ठेवावे ॥33॥
Subject
पुढील मंत्रात तोच विषय (एकमेकाशी कसे वागावे) प्रतिपादित आहे -