Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 32

66 Mantra
16/32
Devata- रुद्रा देवताः Rishi- कुत्स ऋषिः Chhand- स्वराडार्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
नमो॑ ज्ये॒ष्ठाय॑ च कनि॒ष्ठाय॑ च॒ नमः॑ पूर्व॒जाय॑ चापर॒जाय॑ च॒ नमो॑ मध्य॒माय॑ चापग॒ल्भाय॑ च॒ नमो॑ जघ॒न्याय च बु॒ध्न्याय च॥३२॥

नमः॑। ज्ये॒ष्ठाय॑। च॒। क॒नि॒ष्ठाय॑। च॒। नमः॑। पू॒र्व॒जायेति॑ पूर्व॒ऽजाय॑। च॒। अ॒प॒र॒जायेत्य॑पर॒ऽजाय॑। च॒। नमः॑। म॒ध्य॒माय॑। च॒। अ॒प॒ग॒ल्भायेत्य॑पऽग॒ल्भाय॑। च॒। नमः॑। ज॒घ॒न्या᳖य। च॒। बु॒ध्न्या᳖य। च॒ ॥३२ ॥

Mantra without Swara
नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय चापरजाय च नमो मध्यमाय चापगल्भाय च नमो जघन्याय च बुध्न्याय च नमः सोम्याय ॥

नमः। ज्येष्ठाय। च। कनिष्ठाय। च। नमः। पूर्वजायेति पूर्वऽजाय। च। अपरजायेत्यपरऽजाय। च। नमः। मध्यमाय। च। अपगल्भायेत्यपऽगल्भाय। च। नमः। जघन्याय। च। बुध्न्याय। च॥३२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, तुम्ही (ज्येष्ठाय) आपल्यातील अतिवृद्धजनांचा (सत्कार व सम्मान करीत जा) (च) आणि (कनिष्ठाय) बाल्यांचा (कुमार-कुमारिकांचा) (नम:) सत्कार करीत जा (त्यांना पुरस्कारादीद्वारा संमानित करीत जा) (च) तसेच तुम्ही (पूर्वजाय) आपल्यातील ज्येष्ठभ्राता अथवा समाजातील ब्राह्मणांचा (च) आणि (अपरजाय) धाकट्या भावाचा अथवा समाजातील नीच (उपेक्षित वा दलित) मनुष्यांचा देखील (नम:) योग्यतेप्रमाणे आदर करावा त्यांना अन्न आदीद्वारे साहाय्य करा. तसेच (मध्यमाय) समवयस्क लोकांचा, क्षत्रियांचा वा वैश्याचा (योग्यवेळी आवश्यक सत्कार करा) याशिवाय (अपगल्भाव) नीरारभिमानी व साधु स्वभाव असलेल्या लोकांचा (च) देखील (नम:) सम्मान करा. (च) शिवाय (जधन्याय) नीच कर्म करणार्‍या (लोक घृणित मानतात, अशी स्वच्छेते आदीची कामें करणार्‍या) शुद्र वा म्लेच्छांचा (च) देखील सत्कार करा. (बुध्न्याय) आकारात मेघ जसा सर्वांना जल देतो, तद्वत् जो सर्वांचा दाता आहे, त्या दानी मनुष्याचा (नम:) तुम्ही सर्वजण अवश्य आदर-सत्कार करा. (त्यास मान द्या) ॥32॥
Essence
भावार्थ - एकमेकाची भेट होईल, त्यावेळी प्रत्येकाने दुसर्‍याचा आदर करण्यासाठी (नमस्ते) या वाक्याचे उच्चारण करावे. लहानानी मोठ्यांचा, मोठ्यांनी लहानांचा, मीच वा उपेक्षित-दलितजनांचा उत्तमजनांनी आणि नीच वा सामान्यांनी क्षत्रिय, ब्राह्मणांना तसेच ब्राह्मणांदींनी क्षत्रियांचा अवश्य सत्कार करावा (भेट होईल, तेव्हां ‘नमस्ते’ करून त्याच्याविषयी आदर व्यक्त करावा.) अशा प्रकारे सर्व लोकांनी या वेदोक्त पद्धतीद्वारे सर्वत्र शिष्टाचाराचे पालन करावे. ‘नमस्ते’ हे वाक्य उच्चारून एकमेकाचा सहकार सम्मान करावा आणि प्रसन्न व्हावे (अशा आचरणामुळे सर्वांना आनंद होतो) ॥32॥
Subject
मनुष्यानी एकमेकाचा (योग्य कार्य संपन्न करण्याबद्दल) आदर-सत्कार करावा, याविषयी -