Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 31

66 Mantra
16/31
Devata- रुद्रा देवताः Rishi- कुत्स ऋषिः Chhand- स्वराडार्षी पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
नम॑ऽआ॒शवे॑ चाजि॒राय॑ च॒ नमः॒ शीघ्र्या॑य च॒ शीभ्या॑य च॒ नम॒ऽऊर्म्या॑य चावस्व॒न्याय च॒ नमो॑ नादे॒याय॑ च॒ द्वीप्या॑य च॥३१॥

नमः॑। आ॒शवे॑। च॒। अ॒जि॒राय॑। च॒। नमः॑। शीघ्र्या॑य। च॒। शीभ्या॑य। च॒। नमः॑। ऊर्म्या॑य। च॒। अ॒व॒स्व॒न्या᳖येत्य॑वऽस्व॒न्या᳖य। च॒। नमः॑। ना॒दे॒याय॑। च॒। द्वीप्या॑य। च॒ ॥३१ ॥

Mantra without Swara
नम आशवे चाजिराय च नमः शीर्घ्याय च शीभ्याय च नमऽऊर्म्याय चावस्वन्याय च नमो नादेयाय च द्वीप्याय च ॥

नमः। आशवे। च। अजिराय। च। नमः। शीघ्र्याय। च। शीभ्याय। च। नमः। ऊर्म्याय। च। अवस्वन्यायेत्यवऽस्वन्याय। च। नमः। नादेयाय। च। द्वीप्याय। च॥३१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, तुम्ही (आशवे) हवेप्रमाणे तीव्र वेगाने जाणार्‍या (च) आणि (अजिराय) आपल्या स्वारांना दूर दूरच्या देश-प्रदेशात नेणार्‍या घोड्यांना (च) तसेच हत्ती आदी वाहक पशूना (नम:) अन्न आदी देऊन परिपुष्ट करीत जा. त्याचप्रकारे (शीघ्रयाय) शीघ्रगती करण्यात उत्तम असणार्‍या (च) आणि (शीभ्याय) (कार्य) (त्वरित वा लवकर पूर्ण करण्यात समर्थ असणार्‍या लोकांना (च) आणि मध्यम गती असणार्‍या (वा कार्य मध्यम गतीने पूर्ण करणार्‍या लोकांना) (नम:) अन्न आदी देत जा. तसेच (अर्म्याय) जल-तरंगांवर जसे वायू गती करतो (तशी गती-प्रगती करणार्‍या कुशल लोकांना) (च) आणि (अश्वस्वन्माय) उत्तम शब्दांद्वारे लोक ज्याची प्रशंसा करतात, त्या सुप्रसिद्ध व्यक्तीला (अन्न आदी देत जा) (च) तसेच दूरवरून वार्ता आणणार्‍याला (दूताला वा हेराला) आणि (नादेवाय) नदी-प्रदेशात राहणार्‍या (च)(द्वीप्याय) जलद्वीपावर राहणार्‍या लोकांना (च) आणि त्यांच्या संबंधीजनांना (दुर्गम प्रदेशात राहणार्‍या नागरिकांना) (नम:) अन्न देत रहा (अशा आपद्ग्रस्त लोकांसाठी अन्न-धान्याचा पुरवठा करीत जा) (या तुमच्या सत्कार्यामुळे) तुम्हा सर्वांना संपूर्ण आनंद प्राप्त होईल) ॥31॥
Essence
भावार्थ - जे (वैज्ञानिक, यांत्रिक कारागीर) लोक आपल्या बुद्धी व तंत्रकौशल्याद्वारे विमान आदी यानांची निर्मिती करतात तसेच भूमीवर अश्व आदी वाहनांद्वारे शीघ्रगती (शत्रूवर आक्रमण) करतात, ते कोणत्या द्वीपावर वा देश-प्रदेशाला जाऊन आपल्या राज्यकरिता धन आणू शकत नाही? अर्थात ते धाडशी यांत्रिकजन सर्वत्र विहार वा गती करून सर्वांना सुखी करतात ॥31॥
Subject
पुढील मंत्रात, उद्योग कसा करावा, हा विषय प्रतिपादित आहे -