Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 3

66 Mantra
16/3
Devata- रुद्रो देवता Rishi- परमेष्ठी वा कुत्स ऋषिः Chhand- विराडर्ष्यनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
यामिषुं॑ गिरिशन्त॒ हस्ते॑ बि॒भर्ष्यस्त॑वे। शि॒वां गि॑रित्र॒ तां कु॑रु॒ मा हि॑ꣳसीः॒ पुरु॑षं॒ जग॑त्॥३॥

याम्। इषु॑म्। गि॒रि॒श॒न्तेति॑ गिरिऽशन्त। हस्ते॑। बि॒भर्षि॑। अस्त॑वे। शि॒वाम्। गि॒रि॒त्रेति॑ गिरिऽत्र। ताम्। कु॒रु॒। मा। हि॒ꣳसीः॒। पुरु॑षम्। जग॑त् ॥३ ॥

Mantra without Swara
यामिषुङ्गिरिशन्त हस्ते बिभर्ष्यस्तवे । शिवाङ्गिरित्र ताङ्कुरु मा हिँसीः पुरुषञ्जगत् ॥

याम्। इषुम्। गिरिशन्तेति गिरिऽशन्त। हस्ते। बिभर्षि। अस्तवे। शिवाम्। गिरित्रेति गिरिऽत्र। ताम्। कुरु। मा। हिꣳसीः। पुरुषम्। जगत्॥३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (गिरिशन्त) मेघाप्रमाणे प्रजाजनांना सुख देणार्‍या सेनापती, आपण (अस्तवे) शत्रूवर चालविण्यासाठी (याम्) ज्या (इषुम्) बाणावती (हस्ते) आपल्या हातात (विभर्मि) धारण करता, (ताम्) त्या बाणावालीला वा शस्त्रसमूहाला (आमच्याकरिता) (शिवाम्) मंगलकारिणी (करू) करा. (गिरित्र) विद्या शिकविणार्‍यांचे रक्षण करणारे अथवा मेघांचे रक्षण करणार्‍या (वृष्टीपासून होणार्‍या लाभांवर नियंत्रण ठेवणारे) हे राजपुरुष सेनापती, आपण (पुरुषम्) पुरुषार्थी मनुष्यांच्या (जगत्) समूहाला (मा) (हिंसी:) मारू नका (राज्यातील उद्योगी व्यवसायी वा कृषकजनांचे रक्षण करा. त्यांची हानी होऊ देऊ नका) ॥3॥
Essence
भावार्थ - राजपुरुषांचे कर्तव्य आहे की त्यांनी युद्ध विद्येचे सखोल मान मिळवावे तसेच प्रभावशाली अस्त्र-शस्त्र धारण करावेत. मनुष्य आदी श्रेष्ठ प्राण्यांना कधीही उपद्रव देऊ नये अथवा त्यांची हिंसा करू नये. (शत्रू आणि दुष्ट प्राण्यांना अवश्य मारावे) शिवाय (सज्जनांकरिता) मंगलमय आचरण करीत त्यांची रक्षा करावी ॥3॥
Subject
पुढील मंत्रात राजपुरुषांच्या कर्तव्यांविषयी कथन केले आहे-