Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 29

66 Mantra
16/29
Devata- रुद्रो देवता Rishi- कुत्स ऋषिः Chhand- भुरिगतिजगती Swara- निषादः
Mantra with Swara
नमः॑ कप॒र्दिने॑ च॒ व्युप्तकेशाय च॒ नमः॑ सहस्रा॒क्षाय॑ च श॒तध॑न्वने च॒ नमो॑ गिरिश॒याय॑ च शिपिवि॒ष्टाय॑ च॒ नमो॑ मी॒ढुष्ट॑माय॒ चेषु॑मते च॥२९॥

नमः॑। क॒प॒र्दिने॑। च॒। व्यु᳖प्तकेशा॒येति॒ व्यु᳖प्तऽकेशाय। च॒। नमः॑। स॒ह॒स्रा॒क्षायेति॑ सहस्र॒ऽअ॒क्षाय॑। च॒। श॒तध॑न्वन॒ इति॑ श॒तऽध॑न्वने। च॒। नमः॑। गि॒रि॒श॒यायेति॑ गिरिऽश॒याय॑। च॒। शि॒पि॒वि॒ष्टायेति॑ शिपिऽवि॒ष्टाय॑। च॒। नमः॑। मी॒ढुष्ट॑माय। मी॒ढुस्त॑मा॒येति॑ मी॒ढुःऽत॑माय। च॒। इषु॑मत॒ इतीषु॑ऽमते। च॒ ॥२९ ॥

Mantra without Swara
नमः कपर्दिने च व्युप्तकेशाय च नमः सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो गिरिशयाय च शिपिविष्टाय च नमो मीढुष्टमाय चेषुमते च नमो ह्रस्वाय ॥

नमः। कपर्दिने। च। व्युप्तकेशायेति व्युप्तऽकेशाय। च। नमः। सहस्राक्षायेति सहस्रऽअक्षाय। च। शतधन्वन इति शतऽधन्वने। च। नमः। गिरिशयायेति गिरिऽशयाय। च। शिपिविष्टायेति शिपिऽविष्टाय। च। नमः। मीढुष्टमाय। मीढुस्तमायेति मीढुःऽतमाय। च। इषुमत इतीषुऽमते। च॥२९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - गृहस्थजनांचे कर्तव्य आहे की त्यांनी (कपर्दिने) जटाधारी ब्रह्मचार्‍याला (च) आणि (व्युप्तकेशाय) संपूर्ण मुंडन केलेल्या संन्याशाला (च) तसेच संन्यासाश्रम स्वीकारून इच्छिणार्‍या व्यक्तीला (नम:) भोजन द्यावे (त्यांच्या जेवणाची योग्य व्यवस्था अवश्य करावी. (च) तसेच (सहस्राक्षाय) अनेक अगणित शास्त्रांचे ज्ञान असणार्‍या विद्वान ब्राह्मणाचा (च) आणि (शतधन्वने) धनुर्विद्या आणि तशाच अनेकानेक युद्धविद्यामधे कुशल असलेल्या क्षत्रिय शिक्षकाचा (नम:) सत्कार करावा (त्यांना आदर-सन्मान द्यावा) त्याचप्रमाणे गृहस्थाश्रमी लोकांनी (गिरिशयाय) पर्यतीय प्रदेशात राहणार्‍या, गुहावासी वानप्रस्थींचा (च) आणि (शिपिखिष्टाय) पशुपालक वैश्यजनांचा (कृषकांचा) (च) आणि शूद्रांचा (नम:) सत्कार करावा. त्याप्रमाणे (मीदुष्टमाय) वृक्ष, उद्यान, शेत आदीत सिंचनकर्म करणार्‍या कृषकांचा व माळी आदी लोकांचा तसेच (इषुमते) धनुष्यबाणधारी वीर पुरुषांचा (शस्त्राद्वारे, कृषी, उधान, शेती आदीचे रक्षण करणार्‍या प्रहरींचा) (नम:) सत्कार करावा आणि त्यांच्यासाठी अन्नादीची योग्य व्यवस्था करावी. ॥29॥
Essence
भावार्थ - गृहस्थजनांचे कर्तव्य आहे की त्यानी ब्रह्मचारी आदींचा (संन्यासी, वानप्रस्थी, अतिथींचा) अवश्य सत्कार (व स्वागत-सन्मान) करावा. ब्रह्मचार्‍यांकरिता विद्यादानाची व्यवस्था करावी आणि इतरांकडून ही करवून घ्यावी. तसेच संन्यासी आदी वंदनीय लोकांची सेवा करून त्यांच्याकडे असलेले विशेष ज्ञान-विज्ञान ग्रहण करावे ॥29॥
Subject
गृहस्थजनांनी कोणाचा सत्कार कराव, याविषयी -