Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 24

66 Mantra
16/24
Devata- रुद्रा देवताः Rishi- कुत्स ऋषिः Chhand- शक्वरी Swara- धैवतः
Mantra with Swara
नमः॑ स॒भाभ्यः॑ स॒भाप॑तिभ्यश्च वो॒ नमो॒ नमोऽश्वे॒भ्योऽश्व॑पतिभ्यश्च वो॒ नमो॒ नम॑ऽआव्या॒धिनी॑भ्यो वि॒विध्य॑न्तीभ्यश्च वो॒ नमो॒ नम॒ऽउग॑णाभ्यस्तृꣳह॒तीभ्य॑श्च वो॒ नमः॑॥२४॥

नमः॑। स॒भाभ्यः॑। स॒भाप॑तिभ्य॒ इति॑ स॒भाप॑तिऽभ्यः। च॒। वः॒। नमः॑। नमः॑। अश्वे॑भ्यः। अश्व॑पतिभ्य॒ इत्यश्व॑पतिऽभ्यः। च॒। वः॒। नमः॑। नमः॑। आ॒व्या॒धिनी॑भ्य॒ इत्या॑ऽव्या॒धिनी॑भ्यः। वि॒विध्य॑न्तीभ्य॒ इति॑ वि॒ऽविध्य॑न्तीभ्यः। च॒। वः॒। नमः॑। नमः॑। उग॑णाभ्यः। तृ॒ꣳह॒तीभ्यः॑। च॒। वः॒। नमः॑ ॥२४ ॥

Mantra without Swara
नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमोश्वेभ्यो श्वपतिभ्यश्च वो नमो नमऽआव्याधिनीभ्यो विविध्यन्तीभ्यश्च वो नमो नमऽउगणाभ्यस्तृँहतीभ्यश्च वो नमः ॥

नमः। सभाभ्यः। सभापतिभ्य इति सभापतिऽभ्यः। च। वः। नमः। नमः। अश्वेभ्यः। अश्वपतिभ्य इत्यश्वपतिऽभ्यः। च। वः। नमः। नमः। आव्याधिनीभ्य इत्याऽव्याधिनीभ्यः। विविध्यन्तीभ्य इति विऽविध्यन्तीभ्यः। च। वः। नमः। नमः। उगणाभ्यः। तृꣳहतीभ्यः। च। वः। नमः॥२४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - मनुष्यानी सर्वांप्रत असे म्हटले पाहिजे की आम्ही (सभाभ्य:) न्याय करणार्‍या न्यायप्रिय स्त्रियांचा (नम:) सत्कार करतो आणि (सभापतिभ्य:) सभांचे रक्षक असणार्‍या (व:) तुम्हा राजाजनांचा (नम:) सत्कार करतो (अश्वेभ्य:) घोड्यांना (नम:) खाद्य आणि (अश्वपतिभ्य:) अश्वपालक असलेल्या (व:) तुम्हा लोकांना (नम:) अन्न-धान्यादी पुरवितो. (अन्याधिनीभ्य:) शत्रुसैन्याला पळवून लावणार्‍या वा पराभूत करणार्‍या आपल्या सेनेला (नम:) अन्न-धान्यादी देतो. (च) आणि (विविध्यन्तीभ्य:) शत्रूच्या सैनिकांचा वध करणार्‍या (व:) तुम्हा वीरांगनांचा (नम:) सत्कार करतो (उगणाभ्य:) विविधप्रकारे (चर्चा-यंत्रणा) तर्क आदी करून निर्णय करणार्‍या (तुम्हां स्त्रियांना (नम:) अन्न देतो (च) आणि ) (तृंहतीभ्य:) युद्धक्षेत्रात लढणार्‍या (व:) तुम्हा स्त्रियांना (नम:) अन्न, (आवश्यक युद्ध-सामग्री) आदी पुरवितो ॥24॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनी (राष्ट्रातील नागरिकांनी) विविध सभा (लोकसभा, राज्यसभा अथवा राजार्थ सभा, विद्यार्थ सभा व धमार्थ सभा) या सभांद्वारे आणि सभापतीच्या आदेश निर्णयाप्रमाणे राज्याचा प्रबन्ध करावा. (सभेने मान्य केलेल्या कायद्याप्रमाणे वागावे) कधीही एका राजाच्या (निर्णय वा विचारांच्या) अधीन राहून राज्य-शासन चालवू नये, कारण कोणी एक पुरुष अनेकांच्या हित-अहिताचा (योग्य व पूर्ण) विचार कधीही करू शकत नाही. (म्हणून राजाच्या मदतीसाठी विविध सभा पाहिजेत व राजाने त्या सभांचे निर्णय मान्य केले पाहिजेत) ॥24॥
Subject
पुनश्च, पुढील मंत्रात तोच विषय आहे -