Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 23

66 Mantra
16/23
Devata- रुद्रा देवताः Rishi- कुत्स ऋषिः Chhand- निचृदतिजगती Swara- निषादः
Mantra with Swara
नमो॑ विसृ॒जद्भ्यो॒ विद्ध्य॑द्भ्यश्च वो॒ नमो॒ नमः॑ स्व॒पद्भ्यो॒ जाग्र॑द्भ्यश्च वो॒ नमो॒ नमः॒ शया॑नेभ्य॒ऽआसी॑नेभ्यश्च वो॒ नमो॒ नम॒स्तिष्ठ॑द्भ्यो॒ धाव॑द्भ्यश्च वो॒ नमः॑॥२३॥

नमः॑। वि॒सृ॒जद्भ्य॒ इति॑ विसृ॒जत्ऽभ्यः॑। विद्ध्य॑द्भ्य॒ इति॒ विद्ध्य॑त्ऽभ्यः। च॒। वः॒। नमः॑। नमः॑। स्व॒पद्भ्य॒ इति॑ स्व॒पत्ऽभ्यः॑। जाग्र॑द्भ्य॒ इति॒ जाग्र॑त्ऽभ्यः। च॒। वः॒। नमः॑। नमः॑। शया॑नेभ्यः। आसी॑नेभ्यः। च॒। वः॒। नमः॑। नमः॑। तिष्ठ॑द्भ्य इति॒ तिष्ठ॑त्ऽभ्यः। धाव॑द्भ्य॒ इति॒ धाव॑त्ऽभ्यः। च॒। वः॒। नमः॑ ॥२३ ॥

Mantra without Swara
नमो विसृजद्भ्यो विध्यद्भ्यश्च वो नमो नमः स्वपद्भ्यो जाग्रद्भ्यश्च वो नमो नमः शयानेभ्यऽआसीनेभ्यश्च वो नमो नमस्तिष्ठद्भ्यो धावद्भ्यश्च वो नमो नमः सभाभ्यः ॥

नमः। विसृजद्भ्य इति विसृजत्ऽभ्यः। विद्ध्यद्भ्य इति विद्ध्यत्ऽभ्यः। च। वः। नमः। नमः। स्वपद्भ्य इति स्वपत्ऽभ्यः। जाग्रद्भ्य इति जाग्रत्ऽभ्यः। च। वः। नमः। नमः। शयानेभ्यः। आसीनेभ्यः। च। वः। नमः। नमः। तिष्ठद्भ्य इति तिष्ठत्ऽभ्यः। धावद्भ्य इति धावत्ऽभ्यः। च। वः। नमः॥२३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, तुम्ही सर्व लोकांना असे कळू द्या (त्याना सांगा की) आम्ही (राजपुरुष व प्रजाजन) (विसृजद्भ्य:) शत्रूंवर शस्त्र-प्रहार करणार्‍यांना (नम:) अन्न आदी पदार्थ देतो. (च) आणि (विद्धद्भ्य:) शस्त्रांद्वारे शत्रूंचा वध करीत असलेल्या (युद्धात व्यस्त असलेल्या) (व:) तुम्हा वीरजनांना (नम:) अन्न (रसद, पुरवठा) देतो (स्वपद्भ्य:) जे झोपलेले (आळशी व निरूद्योगी) आहेत, त्यांना (सावध व उद्यमी करण्यासाठी) (नम:) वज्राने (जागवितो) (च) आणि (जाम्रद्भ्य:) जागे असलेल्या (व:) तुमच्यासाठी तसेच (तुमच्यापैकी) (शमानेभ्य:) निद्रात्वन लोकांना (निद्राधीन व शांतिकाळात विश्रांती घेत असलेल्या) लोकांना (नम:) अन्न देतो (त्यांच्या भोजनाची व्यवस्था करतो.) (च) आणि (आसीनेभ्य:) आसनावर बसलेल्यांना (व:) तुम्हाला (नम:) अन्न देतो (तिष्ठदभ्य:) उभे असलेल्यांना (नम:) अन्न (च) आणि (धावद्भ्य:) शीघ्र चालणार्‍या (व:) तुम्ही लोकांना (नम:) अन्न देतो (व पुढेही देत राहू) (सैनिक वा वीरगण रणांगणात असोत अगर विश्रांती काळात असोत, त्यांच्या भोजनादीची, त्यांच्या परिवाराच्या पालन-पोषणाची जबाबदारी शासनाने व जनतेने उचलली पाहिजे.) ॥23॥
Essence
भावार्थ - गृहस्थांनी प्रेममय विनम्र वचन बोलून आणि अन्न आदी देऊन सर्व प्राण्यांना सुखी केले पाहिजे ॥23॥
Subject
पुढील मंत्रातही तोच विषय कथिला आहे -