Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 22

66 Mantra
16/22
Devata- रुद्रा देवताः Rishi- कुत्स ऋषिः Chhand- निचृदष्टिः Swara- मध्यमः
Mantra with Swara
नम॑ऽउष्णी॒षिणे॑ गिरिच॒राय॑ कुलु॒ञ्चानां॒ पत॑ये॒ नमो॒ नम॑ऽइषु॒मद्भ्यो॑ धन्वा॒यिभ्य॑श्च वो॒ नमो॒ नम॑ऽआतन्वा॒नेभ्यः॑ प्रति॒दधा॑नेभ्यश्च वो॒ नमो॒ नम॑ऽआ॒यच्छ॒द्भ्योऽस्य॑द्भ्यश्च वो॒ नमः॑॥२२॥

नमः॑। उ॒ष्णी॒षिणे॑। गि॒रि॒च॒रायेति॑ गिरिऽच॒राय॑। कु॒लु॒ञ्चाना॑म्। पत॑ये। नमः॑। नमः॑। इ॒षु॒मद्भ्य॒ इती॑षु॒मत्ऽभ्यः॑। ध॒न्वा॒यिभ्य॒ इति॑ धन्वा॒ऽयिभ्यः॑। च॒। वः॒। नमः॑। नमः॑। आ॒त॒न्वा॒नेभ्य॒ इत्या॑ऽतन्वा॒नेभ्यः॑। प्र॒ति॒दधा॑नेभ्य॒ इति॑ प्रति॒ऽदधा॑नेभ्यः। च॒। वः॒। नमः॑। नमः॑। आ॒यच्छ॑द्भ्य॒ इत्या॒यच्छ॑त्ऽभ्यः। अस्य॑द्भ्य॒ इत्यस्य॑त्ऽभ्यः। च॒। वः॒। नमः॑ ॥२२ ॥

Mantra without Swara
नमऽउष्णीषिणे गिरिचराय कुलुञ्चानाम्पतये नमो नमऽइषुमध्ब्यो धन्वायिभ्यश्च वो नमो नमऽआतन्वानेभ्यः प्रतिदधानेभ्यश्च वो नमो नमऽआयच्छद्भ्यो स्यद्भ्यश्च वो नमः ॥

नमः। उष्णीषिणे। गिरिचरायेति गिरिऽचराय। कुलुञ्चानाम्। पतये। नमः। नमः। इषुमद्भ्य इतीषुमत्ऽभ्यः। धन्वायिभ्य इति धन्वाऽयिभ्यः। च। वः। नमः। नमः। आतन्वानेभ्य इत्याऽतन्वानेभ्यः। प्रतिदधानेभ्य इति प्रतिऽदधानेभ्यः। च। वः। नमः। नमः। आयच्छद्भ्य इत्यायच्छत्ऽभ्यः। अस्यद्भ्य इत्यस्यत्ऽभ्यः। च। वः। नमः॥२२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - आम्ही राजपुरुषांनी तसेच प्रजाजनांनी (प्रशंसनीय कर्म वा सेवा केल्यामुळे) उष्णीविणे) शानदार पागोटे धारण करणार्‍या ग्रामपती (सरपंच, सभापती, चौधरी आदींचा) तसेच (गिरिचराय) (पर्वतभ्रमण करून नवनव्या औषधी, द्रव्य, धातू आदींचा शोध लावणार्‍या) वनधारी मनुष्यांचा (नम:) सत्कार करावा. (वा केला पाहिजे). तसेच (कुलुञ्चानाम्) वाईट स्वभाव असल्यामुळे दुसर्‍याचे धन हिसकावून घेणार्‍या दुर्जनांना (पतये) भूमीवर पाडणार्‍या राजसेवकांचा (नम:) आम्ही सत्कार करतो. (इषुमद्भ्य:) पुष्कळ बाण-संग्रह असणार्‍या वीरास (नम:) आम्ही अन्न देतो. (व) तसेच (धन्वाविभ्य:) धनुष्य धारण करणार्‍या (व:) तुम्हा वीर लोकांकरिता आम्ही (नम:) अन्नादीची व्यवस्था करतो. (आतन्वानेभ्य:) सर्वांकरिता सुखाचा विस्तार करणार्‍यांचा आम्ही (नम:) सत्कार करतो. तसेच (प्रतिदधानेभ्य:) शत्रूंविरूद्ध शस्त्र घेऊन उभे ठाकणारे (व:) तुम्हा लोक आमच्या (नम:) सत्कारास पात्र आहात. (आयच्छद्भ्य:) आम्ही दुर्जनांना दुष्कर्म करण्यापासून परावृत्त करणार्‍या लोकांना (नम:) अन्न-भोजनादी देतो. (च) आणि (अस्यद्भ्य:) दुष्टांवर शस्त्र चालविणार्‍या (व:) तुमच्यासारख्या शूरवीराचा आम्ही (नम:) आदर-सन्मान करतो. ॥22॥
Essence
भावार्थ - राजपुरुष तसेच प्रजाजन यांनी (ग्राम, नगर, जनपद यातील जनहितकारी कर्म करणार्‍या श्रेष्ठजनांच्या वस्त्र आणि अन्न आदी पदार्थ देऊन सत्कार करावा (त्याच्या पुरस्कार आदीद्वारे सन्मान करावा) ॥22॥
Subject
पुढील मंत्रात तोच विषय (राजधर्म) प्रतिपादित आहे -