Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 20

66 Mantra
16/20
Devata- रुद्रो देवता Rishi- कुत्स ऋषिः Chhand- अतिधृतिः Swara- षड्जः
Mantra with Swara
नमः॑ कृत्स्नाय॒तया॒ धाव॑ते॒ सत्व॑नां॒ पत॑ये॒ नमो॒ नमः॒ सह॑मानाय निव्या॒धिन॑ऽआव्या॒धिनी॑नां॒ पत॑ये॒ नमो॒ नमो॑ निष॒ङ्गिणे॑ ककु॒भाय॑ स्ते॒नानां॒ पत॑ये॒ नमो॒ नमो॑ निचे॒रवे॑ परिच॒रायार॑ण्यानां॒ पत॑ये॒ नमः॑॥२०॥

नमः॑। कृ॒त्स्ना॒य॒तयेति॑ कृत्स्नऽआय॒तया॑। धाव॑ते। सत्व॑नाम्। पत॑ये। नमः॑। नमः॑। सह॑मानाय। नि॒व्या॒धिन॒ इति॑ निऽव्या॒धिने॑। आ॒व्या॒धिनी॑ना॒मित्याऽव्या॒धिनी॑नाम्। पत॑ये। नमः॑। नमः॑। नि॒ष॒ङ्गिणे॑। क॒कु॒भाय॑। स्ते॒नाना॑म्। पत॑ये। नमः॑। नमः॑। नि॒चे॒रव॒ इति॑ निऽचे॒रवे॑। प॒रि॒च॒रायेति॑ परिऽच॒राय॑। अर॑ण्यानाम्। पत॑ये। नमः॑ ॥२० ॥

Mantra without Swara
नमः कृत्स्नायतया धावते सत्वनाम्पतये नमो नमः सहमानाय निव्याधिनऽआव्याधिनीनाम्पतये नमो नमो निषङ्गिणे ककुभाय स्तेनानाम्पतये नमो नमो निचेरवे परिचरायारण्यानाम्पतये नमो वञ्चते नमो ॥

नमः। कृत्स्नायतयेति कृत्स्नऽआयतया। धावते। सत्वनाम्। पतये। नमः। नमः। सहमानाय। निव्याधिन इति निऽव्याधिने। आव्याधिनीनामित्याऽव्याधिनीनाम्। पतये। नमः। नमः। निषङ्गिणे। ककुभाय। स्तेनानाम्। पतये। नमः। नमः। निचेरव इति निऽचेरवे। परिचरायेति परिऽचराय। अरण्यानाम्। पतये। नमः॥२०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - मनुष्यांनी (राजपुरुष आणि प्रजाजनांनी) (कृत्स्नायतया) संपूर्ण (वा अधिक मिळविण्याच्या इच्छेने) (धावते) धावणार्‍याला (परिश्रमी, उद्योगी व्यक्तीला) (नम:) अन्न द्यावे. (सत्वनाम्) प्राप्त पदार्थ देणार्‍या व त्यांचे (पतये) रक्षण करणार्‍याचा (नम:) सत्कार करावा. (सहमानाय) बलशाली आणि (निव्याधिने) शत्रूंना निरंतर ताडना करणार्‍या वीरपुरुषाला (नम:) अन्न द्यावे. (आव्याधिनीनाम्) शत्रुसैन्याचे पूर्ण निर्दालन करणार्‍या आपल्या वीर सेनेचा आणि (पतये) त्या स्वसैन्येच्या सेनापतीचा (नम:) सर्वांनी यथोचित आदर-सत्कार करावा. (निषड्गिणे) जो विविध अस्त्र-यथा बाण, तलवार, भुशुण्डी (एक अस्त्र) वातघ्नी म्हणणे बंदूक वा तोफ आणि तोमर (एक प्रकारचा भाला) चालविण्यात निष्णात आहे, त्या (पटाईत, तोयची आदींना) (नम:) अन्न द्यावे. (निचेरवे) निरंतर उद्योग व पुरुषार्थ करीत विचरण करणार्‍या आणि (परिचराय) धर्म, विद्या, माता, पती आणि मित्र आदींची सेवा करणार्‍या उद्योगी व विनम्र (ककुभाय) प्रसन्नमूर्ती व्यक्तीचा (नम:) सत्कार करावा. (स्तेनानाम्) अन्यायाने परद्रव्य हरण करणार्‍या मनुष्यांना (पतये) जो दंडित करणार्‍यांना जो प्रतिबंधित करता, त्या व्यक्तीस (नम:) वज्राद्वारे मारावे. (अरण्यानाम्) वन-पर्वतादींच्या (पतये) रक्षक पुरुषाला (नम:) अन्न आदी पदार्थ द्यावेत ॥20॥
Essence
भावार्थ - राजपुरूषांचे कर्तव्य आहे की पुरुषार्थी, उद्यमी व्यक्तींचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांचा सत्कार करावा. सर्व प्राण्यांवर दया करावी, आपले सैन्य उत्कृष्टपणे प्रशिक्षित ठेवावे. चोर-दरोडेखोर यांना दंडित करावे. आपल्या सेवकांचे रक्षण करावे आणि वन-वृक्षादींना तोडू नये (व तोडू देऊ नये) एवढे सर्व करीत याद्वारे राज्याचा उत्कर्ष वाढवावा. ॥20॥
Subject
पुढील मंत्रात तोच विषय (राजधर्म) सांगितला आहे -