Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 17

66 Mantra
16/17
Devata- रुद्रो देवता Rishi- कुत्स ऋषिः Chhand- निचृदतिधृतिः Swara- षड्जः
Mantra with Swara
नमो॒ हिर॑ण्यबाहवे सेना॒न्ये दि॒शां च॒ पत॑ये॒ नमो॒ नमो॑ वृ॒क्षेभ्यो॒ हरि॑केशेभ्यः पशू॒नां पत॑ये॒ नमो॒ नमः॑ श॒ष्पिञ्ज॑राय॒ त्विषी॑मते पथी॒नां पत॑ये॒ नमो॒ नमो॒ हरि॑केशायोपवी॒तिने॑ पु॒ष्टानां॒ पत॑ये॒ नमः॑॥१७॥

नमः॑। हिर॑ण्यबाहव॒ इति॒ हिर॑ण्यऽबाहवे। से॒ना॒न्य᳖ इति॑ सेना॒ऽन्ये᳖। दि॒शाम्। च॒। पत॑ये। नमः॑। नमः॑। वृ॒क्षेभ्यः॑। हरि॑केशेभ्य॒ इति॒ हरि॑ऽकेशेभ्यः। प॒शू॒नाम्। पत॑ये। नमः॑। नमः॑। श॒ष्पिञ्ज॑राय। त्विषी॑मते। त्विषी॑मत॒ इति॒ त्विषी॑ऽमते। प॒थी॒नाम्। पत॑ये। नमः॑। नमः॑। हरि॑केशा॒येति॒ हरि॑ऽकेशाय। उ॒प॒वी॒तिन॒ इत्युप॑ऽवी॒तिने॑। पु॒ष्टाना॑म्। पत॑ये। नमः॑ ॥१७ ॥

Mantra without Swara
नमो हिरण्यबाहवे सेनान्ये दिशाञ्च पतये नमो नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनाम्पतये नमो नमः शष्पिञ्जराय त्विषीमते पथीनाम्पतये नमो नमो हरिकेशायोपवीतिने पुष्टानाम्पतये नमो नमो बभ्लुशाय ॥

नमः। हिरण्यबाहव इति हिरण्यऽबाहवे। सेनान्य इति सेनाऽन्ये। दिशाम्। च। पतये। नमः। नमः। वृक्षेभ्यः। हरिकेशेभ्य इति हरिऽकेशेभ्यः। पशूनाम्। पतये। नमः। नमः। शष्पिञ्जराय। त्विषीमते। त्विषीमत इति त्विषीऽमते। पथीनाम्। पतये। नमः। नमः। हरिकेशायेति हरिऽकेशाय। उपवीतिन इत्युपऽवीतिने। पुष्टानाम्। पतये। नमः॥१७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे शत्रुताइक सेवाधीश (हिरण्यवाहवे) ज्योतीप्रमाणे तीन तेजाने तळपणार्‍या बाहू असलेल्या (सेनान्ये) सैन्याला प्रशिक्षण देणार्‍या आपणाला (नम:) वज्र अस्त्र प्राप्त होवो. (च) आणि (दिशाम्) राज्याच्या सर्व दिशांमध्ये असलेल्या प्रदेशांचे (पतये) रक्षण करणार्‍या तुम्हाला (नम:) अन्नादी पदार्थ मिळो (हरिकेशभ्य:) ज्यामधे सूर्याच्या हरणशील किरणें व्याप्त आहेत (अथवा हिरवेपण गेलेल्या, वाळलेल्या पानांनी भरलेल्या) (वृक्षेभ्य:) आम्र आदी वृक्ष तोडण्यासाठी तुम्हाला (नम:) वज्र आदी शास्त्र प्राप्त व्हावेत (पशूनाम्) गौ आदी पशूंचे (पतये) रक्षण करणार्‍या तुमचा (नम:) आम्ही सत्कार करतो. (शष्पिञ्जराय) विषयांपासून अलिप्त असणार्‍या आणि (त्विषीमते) न्यायाच्या प्रकाशाने युतिमान असलेल्या आपणांस आम्ही (नम:) नमस्कार करतो (वा आपणास अन्न-धान्यादी मिळो, अशी कामना व्यस्त करतो) (पधीनाम्) पथिजनांचे (पतये) रक्षण करणार्‍या आपला (नम:) आम्ही आदर-सत्कार करतो. (हरिकेशाय) हिरवे (दाट काळे) केश असलेल्या आणि (उपवीतिने) सुंदर यज्ञोवतीत धारण करणार्‍या तुम्हाला (नम:) अनादी पदार्थ प्राप्त व्हावेत तसेच (पुष्टानाम्) नीरोग पुरुषांची (पतये) रक्षा करणार्‍या तुम्हाला (नम:) आमचे नमस्कार असोत. ॥17॥
Essence
भावार्थ - सर्व मनुष्यांचे कर्तव्य आहे की त्यांनी श्रेष्ठजनांचा नेहमी सत्कार करावा, भुकेल्यांना भोजन द्यावे, चक्रवर्ती राज्याच्या रक्षणासाठी यत्न करावेत, पशूंचे रक्षण करावे. पथिक, यात्रेकरूंचे चोर-लुटारू टोळ्यांपासून रक्षण करावे, यज्ञोपनीत धारण करावे तसेच शरीर पुष्ट आणि नीरोग राहण्यासाठी यत्न करून सदा प्रसन्न राहावे. ॥17॥
Subject
राजपुरुषांनी आणि प्रजाजनानी काय केले पाहिजे, पुढील मंत्रात याविषयी कथन केले आहे -