Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 15

66 Mantra
16/15
Devata- रुद्रो देवता Rishi- कुत्स ऋषिः Chhand- निचृदार्षी जगती Swara- निषादः
Mantra with Swara
मा नो॑ म॒हान्त॑मु॒त मा नो॑ऽअर्भ॒कं मा न॒ऽउक्ष॑न्तमु॒त मा न॑ऽउक्षि॒तम्। मा नो॑ वधीः पि॒तरं॒ मोत मा॒तरं॒ मा नः॑ प्रि॒यास्त॒न्वो रुद्र रीरिषः॥१५॥

मा। नः॒। म॒हान्त॑म्। उ॒त। मा। नः॒। अ॒र्भ॒कम्। मा। नः॒। उक्ष॑न्तम्। उ॒त। मा। नः॒। उ॒क्षि॒तम्। मा। नः॒। व॒धीः॒। पि॒तर॑म्। मा। उ॒त। मा॒तर॑म्। मा। नः॒। प्रि॒याः। त॒न्वः᳖। रु॒द्र॒। री॒रि॒ष॒ इति॑ रीरिषः ॥१५ ॥

Mantra without Swara
मा नो महान्तमुत मा नोऽअर्भकम्मा नऽउक्षन्तमुत मा नऽउक्षितम् । मा नो वधीः पितरम्मोत मातरम्मा नः प्रियास्तन्वो रुद्र रीरिषः ॥

मा। नः। महान्तम्। उत। मा। नः। अर्भकम्। मा। नः। उक्षन्तम्। उत। मा। नः। उक्षितम्। मा। नः। वधीः। पितरम्। मा। उत। मातरम्। मा। नः। प्रियाः। तन्वः। रुद्र। रीरिष इति रीरिषः॥१५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (दोन राज्यात युद्ध होत असताना दोन्ही पक्षांनी काही नीति-नियम पाळले पाहिजेत. त्यासंबंधी एक नागरिक शत्रुपक्षातील सेवाधिकार्‍यास सांगत आहे) हे (रुद्र) सेनाधिकारी विद्यावान महोदय, आपण (न:) आमच्या (आमच्यानगर वा राज्यातील) (महान्तम्) उत्तम गुणवान पूजनीय व्यक्तींना (मा) (कधी:) मारू नका. (उत) तसेच (अर्भकम्) तान्ह्या बाळाला (मा) मारू नका. (न:) आमच्या (उक्षन्तम्) गर्भाधान करण्यास योग्य व्यक्तीस (मा) मारू नका (उत) तसेच (न:) आमच्या (उक्षितम्) मातेच्या पोटातील गर्भाला (मा) मारू नका. (न:) आमच्या (पितरम्) पालककर्ता वडिलांना (मा) मारू नका. (उत) तसेच (न:) आमच्या (मातरम्) आईला (मा) (वधी:) मारू नका. तसेच (न:) आमच्या (प्रिया:) घरातील प्रिय स्त्रियांचा (तन्व:) शरीराला (मा) (रीरिष:) मारू नका (लांछित, वा भ्रष्ट करू नका) (या मंत्रात सांगितलेले युद्धप्रसंगी पाळावयाचे नियम दोन्ही पक्षांना लागू होतात. विजयी वा विजित पक्ष यांनी विरोधी पक्षाच्या राज्यातील वृद्ध, बालकें, आई-वडील, सन्तानोत्पत्तीत समर्थ स्त्री-पुरुष यांची हत्या करू नये. शत्रुसैन्यातील सैनिकांशी युद्धक्षेत्रात लढावे, नागरिकांना त्रास देऊ नये) ॥15॥
Essence
भावार्थ - दोन राज्यात युद्ध चालू असताना दोन्ही पक्षातील योद्धाजनांनी वृद्ध, बालकें, युद्धातून पळणारे, युवा, मातेच्या गर्भातील अर्भक, योद्धाचे आई-वडील, पत्नी व घरातील स्त्रिया, युद्ध पाहणारे अथवा शासनासाठी प्रबंध करणारे आणि शत्रूचे दूत यांना मारू नये, मात्र शत्रूच्या नातेवाईकांना (त्यास मदत करणार्‍यांना) कैद करून ठेवावे ॥15॥
Subject
राजपुरुषांनी काय करू नये, याविषयी -