Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 13

66 Mantra
16/13
Devata- रुद्रो देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- निचृदार्ष्यनुस्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
अ॒व॒तत्य॒ धनु॒ष्ट्व सह॑स्राक्ष॒ शते॑षुधे। नि॒शीर्य॑ श॒ल्यानां॒ मुखा॑ शि॒वो नः॑ सु॒मना॑ भव॥१३॥

अ॒व॒तत्येत्य॑व॒ऽतत्य॑। धनुः॑। त्वम्। सह॑स्रा॒क्षेति॒ सह॑स्रऽअक्ष। शते॑षुध॒ इति॒ शत॑ऽइषुधे। नि॒शीर्य्येति॑ नि॒ऽशीर्य॑। श॒ल्याना॑म्। मुखा॑। शि॒वः। नः॒। सु॒मना॒ इति॑ सु॒ऽमनाः॑। भ॒व॒ ॥१३ ॥

Mantra without Swara
अवतत्य धनुष्ट्वँ सहस्राक्ष शतेषुधे । निशीर्य शल्यानाम्मुखा शिवो नः सुमना भव ॥

अवतत्येत्यवऽतत्य। धनुः। त्वम्। सहस्राक्षेति सहस्रऽअक्ष। शतेषुध इति शतऽइषुधे। निशीर्य्येति निऽशीर्य। शल्यानाम्। मुखा। शिवः। नः। सुमना इति सुऽमनाः। भव॥१३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (प्रजाजन म्हणतात) (सहस्राक्ष) युद्धाच्या असंख्य कार्यावर निरीक्षण ठेवणारे आणि (शतेषुधे) अस्त्र-शस्त्रांनी सजलेल्या सैन्याचे अध्यक्ष हे सेनापती, (त्वम्) तुम्ही (धनु:) धनुष्य आणि (शल्यानाम्) शस्त्रांचे (मुखा) अग्रभाग (येक) (अवतत्य) नीट आणि तयार ठेवा. त्याद्वारे शत्रूला (निशीर्य) पुरते मारून (न:) आम्हासाठी (सुमना:) प्रसन्नवदन व (शिव:) मंगलकरी (भव) व्हा. ॥13॥
Essence
भावार्थ - राजपुरूषांनी काम, दाम, दंड आणि भेद, राजनीतीच्या या चार अवयवांची आणि इतर राजकार्यांची संपूर्ण माहिती असावी. तसेच त्यांनी आवश्यक अस्त्र-शस्त्रांचा संचय करावा. त्या शस्त्रादीना तीक्ष्ण आणि त्वरित उपयोगात येणार्‍या अवस्थेत ठेवावे. राजपुरुषांनी शत्रूविषयी कठोरचित्त आणि दु:खदायी असावे, तर तसेच आपल्या प्रजेविषयी कोमलचित आणि सुखकारी असावे ॥13॥
Subject
राजपुरुषांनी कसे असावे, पुढील मंत्रात याविषयी -