Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 12

66 Mantra
16/12
Devata- रुद्रो देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- निचृदार्ष्यनुस्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
परि॑ ते॒ धन्व॑नो हे॒तिर॒स्मान् वृ॑णक्तु वि॒श्वतः॑। अथो॒ यऽइ॑षु॒धिस्तवा॒रेऽअ॒स्मन्निधे॑हि॒ तम्॥१२॥

परि॑। ते॒। धन्व॑नः। हे॒तिः। अ॒स्मान्। वृ॒ण॒क्तु॒। वि॒श्वतः॑। अथो॒ऽइत्यथो॑। यः। इ॒षु॒धिरिती॑षु॒ऽधिः। तव॑। आ॒रे। अ॒स्मत्। नि। धे॒हि॒। तम् ॥१२ ॥

Mantra without Swara
परि ते धन्वनो हेतिरस्मान्वृणक्तु विश्वतः । अथो यऽइषुधिस्तवारे अस्मन्निधेहि तम् ॥

परि। ते। धन्वनः। हेतिः। अस्मान्। वृणक्तु। विश्वतः। अथोऽइत्यथो। यः। इषुधिरितीषुऽधिः। तव। आरे। अस्मत्। नि। धेहि। तम्॥१२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (प्रजाजनांची उक्ती) हे सेनापती, (ते) तुमचे हे जे (धन्वन:) धनुष्य आहे, त्याची गती (प्रशर वा मार) दूरपर्यंत आहे) त्या दूरगामी धनुष्यबाणाच्या साहाय्याने (अस्मान्) आम्हाला सर्वत: (आरे) दूर दूरपर्यंत (परिवृणक्तु) संरक्षित असू द्या. (अथ) यानंतर (तव) तुमचा (य:) जो (इषुधि:) बाण ठेवण्याचा भाता आहे, (तम्) त्याला (अस्मत्) आमच्याजवळ राहून (नि, धेहि) निरंतर धारण करा (धनुष्य-बाण आदी अस्त्र-शस्त्रांनी आम्हा प्रजाजनांचे रक्षण करा) ॥12॥
Essence
भावार्थ - राजा तसेच प्रजाजनांचेही कर्तव्य आहे की युद्धकला शिकावी आणि शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घ्यावे. तसेच शस्त्रादींचा संग्रह आपल्याजवळ सदैव असू द्यावा. त्या शस्त्रांद्वारे राजाने प्रजेचे व प्रजेने राजाचे योग्यवेळी रक्षण अवश्य करावे ॥12॥
Subject
राजा आणि प्रजाजन यांची परस्परातील कर्तव्यें काय आहेत याविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -