Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 11

66 Mantra
16/11
Devata- रुद्रो देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- निचृदनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
या ते॑ हे॒तिर्मी॑ढुष्टम॒ हस्ते॑ ब॒भूव॑ ते॒ धनुः॑। तया॒स्मान् वि॒श्वत॒स्त्वम॑य॒क्ष्मया॒ परि॑ भुज॥११॥

या। ते॒। हे॒तिः। मी॒ढु॒ष्ट॒म॒। मी॒ढु॒स्त॒मेति॑ मीढुःऽतम। हस्ते॑। ब॒भूव॑। ते॒। धनुः॑। तया॑। अ॒स्मान्। वि॒श्वतः॑। त्वम्। अ॒य॒क्ष्मया॑। परि॑। भु॒ज॒ ॥११ ॥

Mantra without Swara
या ते हेतिर्मीढुष्टम हस्ते बभूव ते धनुः । तयास्मान्विश्वतस्त्वमयक्ष्मया परि भुज ॥

या। ते। हेतिः। मीढुष्टम। मीढुस्तमेति मीढुःऽतम। हस्ते। बभूव। ते। धनुः। तया। अस्मान्। विश्वतः। त्वम्। अयक्ष्मया। परि। भुज॥११॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (मीदुष्टम्) अत्यंत वीर्यवान बलशाली सेनापती, ही (या) जी (ते) तुमची सेना आहे, (ती शस्त्राने समृद्ध असावी) (ते) तुमच्या (हस्ते) हातात (धनु:) धनुष्य आणि (हेति:) वज्र (बभूल) असावे. आणि (तया) त्या (अयक्ष्मया) पराजयरुप रोगाला दूर ठेवणार्‍या सैन्याने आणि धनुष्य आदी शस्त्रांनी (अस्मान्) आम्हा प्रजाजनांचे व सैनिकांचे (त्वम्) तुम्ही (विश्वत:) सर्व बाजूंनी (परि) चांगल्याप्रकारे (भुज) रक्षण आणि पालन करा ॥11॥
Essence
भावार्थ - जे विद्या आणि वय या दृष्टीने अनुभव संपन्न उपदेशक विद्वान असतात, त्यांचे कर्तव्य आहे की त्यानी सेनापती आदी अधिकार्‍यांना उपदेश करावा. त्यांना सांगावे की तुमच्या अधिकारात जेवढी सैन्यशक्ती आहे, त्याद्वारे राज्यातील सर्व सज्जनांचे सर्वदृष्ट्या रक्षण करावे आणि दुष्टांना दंडित करावे. ॥11॥
Subject
सेनापती आदी सैन्याधिकार्‍यांना कोणी काय काय उपदेश करावा, पुढील मंत्रात याविषयी कथन केले आहे-