Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 16 / Mantra 10

66 Mantra
16/10
Devata- रुद्रो देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- भुरिगार्ष्युष्णिक् Swara- गान्धारः
Mantra with Swara
विज्यं॒ धनुः॑ कप॒र्दिनो॒ विश॑ल्यो॒ बाण॑वाँ२ऽउ॒त। अने॑शन्नस्य॒ याऽइष॑वऽआ॒भुर॑स्य निषङ्ग॒धिः॥१०॥

विज्य॒मिति॒ विऽज्य॑म्। धनुः॑। क॒प॒र्द्दिनः॑। विश॑ल्य॒ इति॒ विऽश॑ल्यः। बाण॑वा॒निति॒ बाण॑ऽवान्। उ॒त। अने॑शन्। अ॒स्य॒। याः। इष॑वः। आ॒भुः। अ॒स्य॒। नि॒ष॒ङ्ग॒धिरिति॑ निषङ्ग॒ऽधिः ॥१० ॥

Mantra without Swara
विज्यन्धनुः कपर्दिनो विशल्यो वाणवाँऽउत । अनेशन्नस्य याऽइषव आभुरस्य निषङ्गधिः ॥

विज्यमिति विऽज्यम्। धनुः। कपर्द्दिनः। विशल्य इति विऽशल्यः। बाणवानिति बाणऽवान्। उत। अनेशन्। अस्य। याः। इषवः। आभुः। अस्य। निषङ्गधिरिति निषङ्गऽधिः॥१०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे धनुर्वेद जाणणार्‍या मनुष्यांनो (सेनापतीचे सैनिकहो ) (तुम्ही हे पहावे की युद्धभूमीत) (अस्थ) या (कपर्दिन:) सुंदर जराजूट वा केशकल्याप धारण करणार्‍या सेनापतीचे (धनु:) धनुष्य (कधीही) (विज्यम्) प्रत्यंचारहित होऊ नये. (धनुष्याची दोरी तूटू नये) तसेच या सेनापतीच्या) (विशल्य:) बाणाचे अग्रभाग (तूटू नये) याच्याकडील (आभ्रु:) शस्त्रांचा साठा (कधी संपू नये (उत) आणि (अस्य) अस्त्र-शस्त्र धारण करणार्‍या या सेनापतीचा (निषड्गधि:) बाण ठेवण्याचे साधन भाता कधीही रिकामा राहू नये. (तुम्ही इतर सैनिकांनी पहावे की) या सेनापती जवळ (बाणवान्) बाणा, अस्त्र-शस्त्रादींचा भरपूर साठी राहावा (या:) सेनापतीजवळ जे (इषव:) बाण आहेत, ते (अनेशन्) नष्ट होणार नाहीत (याविषयी लक्ष ठेवा) सेनेला रसद वा अस्त्र-शस्त्रांचा पुरवठा करणार्‍या अधिकारी वर्गाला उद्देशून अमात्याने दिलेला आदेश वाटतो ॥१०॥
Essence
भावार्थ - युद्ध करण्यास इच्छुक असणार्‍या वा (रणांगणाकडे जाणार्‍या पुरुषांनी आपले धनुष्य, बाण, प्रत्यञ्चा आदी अस्त्रांना मजबूत आहेत की नाही, याविषयी जागरूक असावे. बाणांचा साठा भरपूर असावा. तसेच सेनापती आदी अधिकार्‍यांचे कर्तव्य आहे की त्यांनी जर त्यांच्या युद्धस्थ सैनिकांजवळ पुरेसे बाण आदी नसतील, तर वारंवार ते देण्याची व्यवस्था करावी. ॥१०॥
Subject
पुढील मंत्रातही तोच विषय (राजधर्म) प्रतिपादित आहे -