Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 15 / Mantra 65

65 Mantra
15/65
Devata- विद्वान् देवता Rishi- मधुच्छन्दा ऋषिः Chhand- विराडनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
स॒हस्र॑स्य प्र॒मासि॑ स॒हस्र॑स्य प्रति॒मासि॑ स॒हस्र॑स्यो॒न्मासि॑ सा॒ह॒स्रोऽसि स॒हस्रा॑य त्वा॥६५॥

स॒हस्र॑स्य। प्र॒मेति॑ प्र॒ऽमा। अ॒सि॒। स॒हस्र॑स्य। प्र॒ति॒मेति॑ प्रति॒ऽमा। अ॒सि॒। स॒हस्र॑स्य। उ॒न्मेत्यु॒त्ऽमा। अ॒सि॒। सा॒ह॒स्रः। अ॒सि॒। स॒हस्रा॑य। त्वा॒ ॥६५ ॥

Mantra without Swara
सहस्रस्य प्रमासि सहस्रस्य प्रतिमासि सहस्रस्योन्मासि साहस्रोसि सहस्राय त्वा ॥

सहस्रस्य। प्रमेति प्रऽमा। असि। सहस्रस्य। प्रतिमेति प्रतिऽमा। असि। सहस्रस्य। उन्मेत्युत्ऽमा। असि। साहस्रः। असि। सहस्राय। त्वा॥६५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वान पुरुष, वा हे विदुषी स्त्री, तू (सहस्रस्य) असंख्य पदार्थांनी भरलेल्या या जगाच्या (प्रमा) यथार्थ ज्ञानाचा अधिकारी अधिकारिणी (असि) आहेस. (सहस्रस्य) अगणित पदार्थांना (प्रतिमा) तोलण्या-मापण्याची शक्ती तुझ्यात (असि) आहे. (सहस्रस्य) तू जगातील (असंख्य पदार्थांना (उन्मा) तोलणार्‍या तुलाप्रमाणे (असि) आहेस. तू (साहस्र:) असंख्य पदार्थ आणि पदार्थ विद्येने संपन्न (असि) आहेस. यामुळे (सहस्राय) जगातील असंख्य प्रयोजनांच्या पूर्तीसाठी परमेश्वराने (त्वा) तुला स्थिर वा स्थापित करावे. (परमेश्वराने मनुष्याला पदार्थांचे गुण, क्रिया, जाणण्याची, त्या पदार्थांचे माप, परिमाण, तोलन आदीचे ज्ञान दिले आहे, म्हणून परमेश्वराने मानवाला या मंत्राद्वारे उपदेश केला आहे की त्याने त्या ज्ञानाचा सदुपयोग करावा आणि सृष्टि निर्माण करून परमेश्वराने मनुष्यासाठी जे कार्य वा प्रयोजन निश्चित केले आहे, त्याची पूर्तता करावी. ॥65॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा आहे. या मंत्रात पूर्वीच्या मंत्रातून (64 वा मंत्र) ‘परमेष्ठी’ ‘सादयतु’ या दोन शब्दांची अनुवृत्ती केली आहे. माणसांचे व्यवहार, (दैनंदिन कामकाज, खरेदी-विक्री आदी) या तीन साधनांद्वारे संपन्न होतात. एक यथार्थ विज्ञान (भौतिकशास्त्र) दुसरे -पदार्थ तोलणे-मोजणेसाठीची साधने शेर अच्छेरची वजनें आणि से साधन आहे- तराजू आदी । येथे शिशिर ऋतूचे वर्णन पूर्ण होत आहे ॥65॥
Subject
मनुष्यांनी काय करावे (कर्तव्यें कोणती?) पुढील मंत्रात याविषयी कथन केले आहे -
Footnote
या अध्यायामध्ये ऋतुविद्येचे प्रतिपादन असल्यामुळे या अध्यायाची संगती पूर्वीच्या अध्यायाशी आहे, हे जाणून असावे.^पंधरावा अध्याय समाप्त