Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 15 / Mantra 56

65 Mantra
15/56
Devata- अग्निर्देवता Rishi- परमेष्ठी ऋषिः Chhand- निचृदनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
अ॒यं ते॒ योनि॑र्ऋ॒त्वियो॒ यतो॑ जा॒तोऽअरो॑चथाः। तं जा॒नन्न॑ग्न॒ऽआ रो॒हाथा॑ नो वर्धया र॒यिम्॥५६॥

अ॒यम्। ते॒। योनिः॑। ऋ॒त्वियः॑। यतः॑। जा॒तः। अरो॑चथाः। तम्। जा॒नन्। अ॒ग्ने॒। आ। रो॒ह॒। अथ॑। नः॒। व॒र्ध॒य॒। र॒यिम् ॥५६ ॥

Mantra without Swara
अयन्ते योनिरृत्वियो यतो जातोऽअरोचथाः । तञ्जानन्नग्नऽआरोहाथा नो वर्धया रयिम् ॥

अयम्। ते। योनिः। ऋत्वियः। यतः। जातः। अरोचथाः। तम्। जानन्। अग्ने। आ। रोह। अथ। नः। वर्धय। रयिम्॥५६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (घरातील वरिष्ठजन, श्वसुर आदी घरातील पतीस वा पत्नीस म्हणत आहेत) हे (अग्ने) विद्वान पुरुष (पती) वा हे विदुषी स्त्री (पत्नी), (अयम्) हे (ते) तुझे (ऋत्विय:) ऋतूप्रमाणे का वय आदीप्रमाणे प्राप्त झालेले (योनि:) घर आहे. (युवावस्था प्राप्त झाल्यानंतर गृहाश्रमाची कर्तव्ये पार पाडण्यासाठी तुला हे घर मिळाले आहे) (यत:) ज्या विद्या (कला) आदींच्या पठन-पाठनासाठी (जात:) तू प्रसिद्ध आहेस, त्या विद्या-कला आदी क्षेत्रात) (अरोचथा:) अधिक वा उत्तरोत्तर प्रकाशमान, कीर्तिमान हो (तम्) त्या विद्येला (जानन्) जाणत, तू (आ रोह) धर्ममार्गावर आरुढ हो. (अथ) आणि या नंतर तू (न:) आमची वा आमच्यासाठी (रदिम्) संपत्ती-समृद्धी (वर्धय) वाढव. ॥56॥
Essence
भावार्थ - विवाहाप्रसंगी वर-वधुकडून ही एक दुसरी प्रतिज्ञा देखील म्हणवून घेतली पाहिजे की तुम्ही दोघे ब्रह्मचर्य आणि विद्या यांमुळे प्रशंसित वा महनीय झाला आहात. त्या ब्रह्मचर्य आणि विद्या-प्रसार कार्याचा नेहमी प्रचार करीत जा. तसेच आपल्या पुरुषार्थाने धनादी पदार्थांची वृद्धी करून त्या संपत्तीचा उपयोग चांगल्या कामासाठी करीत जा. इथपर्यंत हेमन्त ऋतूविषयीचे व्याख्यान पूर्ण होत आहे ॥56॥
Subject
पुढील मंत्रात तोच विषय प्रतिपादित आहे-